IndiGo Vs SpiceJet Share: इंडिगोच्या उड्डाणांमधील गोंधळ सातव्या दिवशीही कायम आहे. दिल्ली आणि बंगळुरुमधून २५० हून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत. याच दरम्यान इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनचे शेअर्स कोसळले आहेत. दुसरीकडे, स्पाइसजेटच्या शेअर्सनी मात्र भरारी घेतली आहे.
इंटरग्लोब एव्हिएशनच्या शेअर्समध्ये आजही मोठी घसरण दिसून आली. आजच्या व्यवहारात आतापर्यंत ७ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली. शेअर ५११० रुपयांवर उघडल्यानंतर सकाळी सव्वा अकरा वाजेपर्यंत ७.१५% नं घसरून ४,९८६.५० रुपयांवर व्यवहार करत होता.
२४ रुपयांच्या वांग्यांच्या नादात लागला ₹८७,००० चा चुना, एका चुकीच्या कॉलनं 'गेम'च झाला
दुसरीकडे, स्पाइसजेटचे शेअर्स सव्वा अकराच्या सुमारास जवळपास ११ टक्क्यांनी वाढून ३४.७० रुपयांवर व्यवहार करत होते. विशेष म्हणजे, मागील ५ दिवसांत हजारो फ्लाईट्स रद्द करणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या एअरलाइन कंपनी इंडिगोचे शेअर्स या कालावधीत सुमारे १४ टक्क्यांनी कोसळले आहेत. पाच दिवसांपूर्वी हा शेअर ५७९६ रुपयांवर होता आणि आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ५००० रुपयांच्या खाली व्यवहार करत होता.
इंडिगोवर संकट का आलं?
पायलट्सच्या नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिट (FDTL) नियमांमधील नियामक बदलांचं कारण देत इंडिगो २ डिसेंबरपासून शेकडो उड्डाणे रद्द करत आहे, ज्यामुळे देशभरातील विमानतळांवर लाखो प्रवासी अडकले आहेत. सरकार आणि प्रवासी, या दोघांकडूनही एअरलाइनवर दबाव वाढत आहे.
पहिल्या तीन दिवसांपर्यंत एअरलाइननं मोठ्या संख्येनं उड्डाणं रद्द झाल्याचं स्वीकारलं नाही. जेव्हा शुक्रवारी कंपनीनं १,६०० उड्डाणे रद्द केली (जो भारतीय विमान वाहतूक इतिहासातील एक विक्रम आहे), तेव्हा सीईओ एल्बर्स यांनी एक व्हिडिओ जारी करून प्रवाशांची झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली. तथापि, त्यांनी त्या दिवशी रद्द झालेल्या उड्डाणांच्या संख्येचा उल्लेख केला नाही.
डीजीसीएने (DGCA) रविवारी रात्री उशिरा एक आदेश जारी करून इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर इसिड्रो पोर्कव्हेरस यांना एअरलाइनच्या कामकाजात सुरू असलेल्या व्यत्ययाबद्दल जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर देण्याची अंतिम मुदत सोमवार संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वाढवली आहे. शनिवारी जारी केलेल्या नोटीसमध्ये नियामकानं म्हटलं होतं की, मोठ्या प्रमाणात झालेलं परिचालन अपयश नियोजन, देखरेख आणि संसाधन व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी दर्शवतात.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Indigo flights disrupted, shares fall. SpiceJet shares surge 10% amidst Indigo's operational issues and DGCA scrutiny over flight cancellations, impacting travelers.
Web Summary : इंडिगो उड़ानों में व्यवधान से शेयर गिरे। स्पाइसजेट के शेयर 10% बढ़े। इंडिगो की उड़ान रद्द करने पर डीजीसीए की जांच जारी है, जिससे यात्री प्रभावित हैं।