Share Market Today : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा वाईट परिणाम भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातगुंतवणूकदारांची निराशा कायम राहिली असून, सोमवारी, २९ सप्टेंबर रोजी सलग सातव्या दिवशी प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. आयटी शेअर्समध्ये झालेली विक्री आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली निधीची काढणी यामुळे बाजारातील वातावरण कमजोर राहिले.
RBI पतधोरण समितीच्या बैठकीमुळेही गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरी दिसून आली.
- सेन्सेक्स : ६१.५२ अंकांनी घसरून ८०,३६४.९४ वर बंद.
- निफ्टी : १९.८० अंकांनी घसरून २४,६३४.९० वर बंद.
निर्देशांक घसरले, तरी गुंतवणूकदारांनी ₹१.१८ लाख कोटी कमावले!बाजार घसरला असला तरी, सोमवारी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील दिवशीच्या ४५०.५५ लाख कोटींवरून वाढून ४५१.७३ लाख कोटींवर पोहोचले. यामुळे, एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये सुमारे १.१८ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. निवडक लार्ज-कॅप आणि मिड-कॅप शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे ही वाढ दिसून आली.
क्षेत्रीय आणि व्यापक बाजाराची संमिश्र कामगिरीसोमवारी व्यापक बाजारपेठेची कामगिरी संमिश्र राहिली. बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स ०.१७ टक्क्यांनी घसरला, तर बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये ०.१५ टक्क्यांची तेजी दिसून आली.तेजी असलेले क्षेत्र : आयटी, ऑटो, बँकिंग, युटिलिटी, मेटल आणि पॉवर क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली वाढ नोंदवली गेली.घसरण असलेले क्षेत्र : याउलट, काही निवडक शेअर्समध्ये विक्रीचा दबाव राहिला.
सेन्सेक्समधील सर्वाधिक तेजी-घसरणसेन्सेक्समधील ३० पैकी १५ शेअर्समध्ये तेजी तर १५ शेअर्समध्ये घसरण झाली.
सर्वाधिक तेजी असलेले ५ शेअर्स | सर्वाधिक घसरण असलेले ५ शेअर्स |
टायटन : २.३०% वाढ | ॲक्सिस बँक : १.९१% घसरण |
स्टेट बँक ऑफ इंडिया : १.५८% वाढ | मारुती सुझुकी : १.६५% घसरण |
इंटरनल : १.२८% वाढ | लार्सन ॲन्ड टुब्रो (L&T): १.३९% घसरण |
ट्रेंट : १.१५% वाढ | आयसीआयसीआय बँक : ०.९५% घसरण |
भारत इलेक्ट्रॉनिक्स : १.०५% वाढ | भारती एअरटेल : ०.८१% घसरण |
वाचा - पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
एकूण बाजार स्थिती: बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर एकूण ४,३७७ शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी १,९१९ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर २,२७४ शेअर्समध्ये घसरण झाली. तसेच, १४६ शेअर्सनी आज आपला नवा ५२-आठवड्यांचा उच्चांक गाठला.
Web Summary : Despite a 7-day market slump, investors gained ₹1.18 lakh crore due to buying in large and mid-cap shares. While the Sensex and Nifty fell, overall market capitalization increased. IT, auto, and banking sectors saw gains, contrasting with losses in select shares.
Web Summary : बाजार में लगातार 7वें दिन गिरावट के बावजूद, निवेशकों ने ₹1.18 लाख करोड़ कमाए, क्योंकि बड़े और मध्यम आकार के शेयरों में खरीदारी हुई। सेंसेक्स और निफ्टी में गिरावट आई, लेकिन कुल बाजार पूंजीकरण में वृद्धि हुई। आईटी, ऑटो और बैंकिंग क्षेत्रों में लाभ हुआ, जबकि कुछ शेयरों में नुकसान हुआ।