Join us

शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 17:38 IST

Share Market Today: भारतीय शेअर बाजारांनी आज सलग चौथ्या दिवशी दिवाळी साजरी केली. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही एका वर्षातील नवीन उच्चांक गाठले.

Share Market Today : जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतांच्या जोरावर भारतीय शेअर बाजारात आज, २७ ऑक्टोबर रोजी मोठी तेजी दिसून आली. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची वाढलेली शक्यता, सणासुदीच्या हंगामातील मजबूत विक्री आणि कंपन्यांच्या तिमाही निकालांमध्ये सुधारणेच्या अपेक्षा यामुळे गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. आजच्या कारोबारामध्ये सेन्सेक्स ५५० अंकांनी अधिक वधारून बंद झाला, तर निफ्टीने व्यवहारादरम्यान २६,००० चा महत्त्वाचा टप्पा गाठला.

बाजार बंद होतानाची स्थितीबीएसई सेन्सेक्स: ५६६.९६ अंकांनी (०.६७%) वाढून ८४,७७८.८४ वर बंद झाला.निफ्टी: १७०.९ अंकांनी (०.६६%) वाढून २५,९६६.०५ वर बंद झाला (२६,००० चा टप्पा कायम ठेवू शकला नाही).

गुंतवणूकदारांनी कमावले २.९८ लाख कोटी!आजच्या तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात मोठी वाढ झाली.बाजार भांडवल मागील दिवसाच्या ४६८.९२ लाख कोटींवरून वाढून ४७१.९० लाख कोटींवर पोहोचले.यामुळे, गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये एका दिवसात सुमारे २.९८ लाख कोटी रुपयांची भर पडली.

क्षेत्रीय बाजारात मोठी वाढआजच्या व्यवहारात जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या निशाणीत बंद झाले.सर्वाधिक तेजी: निफ्टी पीएसयू बँक इंडेक्समध्ये १.५% हून अधिकची मोठी वाढ झाली.इतर वधारलेले सेक्टर: रियल्टी आणि ऑटो इंडेक्समध्ये १% पेक्षा जास्त तेजी नोंदवली गेली. तसेच, मेटल आणि ऑइल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्येही जोरदार खरेदी झाली.

सेन्सेक्समधील तेजी-मंदीचे चित्रसेन्सेक्समधील ३० पैकी २२ शेअर्स तेजीसह बंद झाले, तर ८ शेअर्समध्ये घसरण झाली.

सर्वाधिक वधारलेले शेअर्स वाढ (%) सर्वाधिक घसरलेले शेअर्सघसरण (%)
भारती एअरटेल२.५६%कोटक महिंद्रा बँक-१.७४%
रिलायन्स इंडस्ट्रीज२.२४%भारत इलेक्ट्रॉनिक्स-१.६२%
इटरनल१.९९%इन्फोसिस-०.९१%
स्टेट बँक ऑफ इंडिया१.८०% |अदानी पोर्ट्स-०.६०%
टाटा मोटर्स पीव्ही१.६४%बजाज फायनान्स-०.४७%

एकूण व्यवहाराचा आढावा

  • बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज वर आज एकूण ४,५०२ शेअर्समध्ये व्यवहार झाला
  • तेजी असलेले शेअर्स: २,१७८
  • घसरण झालेले शेअर्स: २,११३
  • स्थिर राहिलेले शेअर्स: २११

वाचा - दरमहा फक्त ₹१०,००० च्या गुंतवणुकीतून मिळवा ८.८४ कोटींचा फंड! निवृत्तीनंतर २ लाख पेन्शन आरामात मिळेल

याशिवाय, आजच्या व्यवहारात १,९३५ शेअर्सने आपला ५२-आठवड्यांचा नवीन उच्चांक गाठला, तर ९५ शेअर्स ५२-आठवड्यांच्या नवीन नीचांकी पातळीवर पोहोचले. बाजारातील हा उत्साह दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संकेत देत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Share Market Rockets: PSU Banks, Realty, Auto Stocks in Demand

Web Summary : Indian stock market surged, fueled by global cues and festive demand. Sensex jumped 550 points, Nifty neared 26,000. Investors gained ₹2.98 lakh crore as PSU banks, realty, and auto sectors led the rally. 2178 shares advanced on BSE.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकपैसा