Dollar Vs Rupee : सोमवार, २४ नोव्हेंबर रोजी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ८९.४९ रुपयांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. डॉलरची देशांतर्गत मागणी वाढल्याने रुपयावर हा मोठा दबाव आला आहे. स्थानिक चलनात इतकी मोठी घसरण झाल्यामुळे, विशेषत: आयात करणाऱ्या कंपन्यांवर वाढलेली किंमत, वाढती महागाई आणि एकूणच अस्थिरता अशी चिंता वाढली आहे.
रुपया घसरणीचे कारण काय?सध्या जागतिक पातळीवर शांत वातावरण असताना आणि कच्च्या तेलाच्या किमती स्थिर असतानाही रुपयाची ही तीव्र घसरण आश्चर्याची बाब आहे. CR फॉरेक्स ॲडव्हायजर्सनुसार, जागतिक संकेत सपाट असताना, डॉलर इंडेक्स स्थिर असताना आणि इतर उदयोन्मुख बाजारातील चलनांवर कोणताही दबाव नसतानाही रुपया घसरत आहे.डॉलरच्या पुरवठ्यात झालेली कमतरता आणि त्याची मोठी मागणी यामुळे बाजारात तरलतेची पोकळी निर्माण झाली आहे.आरबीआयची भूमिका : यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ८८.८० रुपयांच्या पातळीचे शांतपणे संरक्षण करत होती. मात्र, आता RBI बाजूला झाल्यामुळे रुपयातील घसरण अधिक तीव्र झाली आहे, ज्यामुळे स्टॉप-लॉस ऑर्डर आणि वाढीव सट्टेबाजी सुरू झाली आहे.
शेअर बाजारावर तात्काळ परिणाम
- रुपयामध्ये मोठी घसरण झाल्यास त्याचा परिणाम इक्विटी बाजारातील भावनांवर होतो. मेहता इक्विटीजचे राहुल कलंतरी यांच्या मते, रुपयातील घसरण सामान्यतः बाजारात जोखीम टाळण्याचे वातावरण निर्माण करते. जास्त व्हॅल्युएशन असलेल्या मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्सवर अधिक दबाव येण्याची शक्यता आहे. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार रुपया नवीन नीचांकी पातळीवर पोहोचल्यास डिफेन्सिव्ह होतात, कारण यामुळे डॉलर-अॅडजस्टेड रिटर्न कमी होतात.
- तरीही, चॉईस वेल्थचे अक्षत गर्ग यांनी भारताची मूलभूत आर्थिक कथा मजबूत असल्याचे सांगून, मॅक्रो स्थिरता टिकून राहिल्यास कोणतीही घसरण हलकी असेल, असा विश्वास व्यक्त केला.
कोणत्या क्षेत्राला फायदा, कोणाला तोटा?
| फायदा होणारे क्षेत्र (निर्यात आधारित) | तोटा होणारे क्षेत्र (आयात आधारित) |
| टेक्स्टाईल (वस्त्रोद्योग) | एव्हिएशन (विमान वाहतूक) - वाढलेले इंधन खर्च. |
| फार्मास्युटिकल्स | ऑईल मार्केटिंग कंपन्या - कच्च्या तेलाची वाढलेली किंमत. |
| जेम्स अँड ज्वेलरी | इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्राहक टिकाऊ वस्तू. |
| आयटी आणि केमिकल्स | ऑटो (मोठ्या आयात घटकांमुळे). |
| ऑटो ॲन्सिलरीज | पॉवर युटिलिटीज (कोळसा आयातीवर अवलंबून). |
पुढील मार्ग आणि अपेक्षाबहुतांश तज्ज्ञांना वाटते की रुपयाची ही घसरण अस्थायी असू शकते.क्रूड तेलातील नरमाई, डॉलर इंडेक्स थंड होणे आणि RBI चा सातत्यपूर्ण हस्तक्षेप यामुळे रुपयाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.विश्लेषकांना अपेक्षा आहे की, जर हे घटक अनुकूल ठरले, तर रुपया पुढील तीन ते चार तिमाहींमध्ये अधिक स्थिर श्रेणीत येईल. परदेशी गुंतवणूकदार देखील रुपयाच्या कमजोरीऐवजी उत्पन्नातील सुधारणांवर लक्ष केंद्रित करून भारतात परत येतील, ज्यामुळे चलनाला स्थैर्य मिळेल.
वाचा - सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : The rupee hit a record low of ₹89.49 against the dollar due to increased demand. Experts suggest the dip may be temporary, with potential relief from stable crude oil prices and RBI intervention. Export-oriented sectors like textiles benefit, while import-heavy sectors face challenges.
Web Summary : डॉलर के मुकाबले रुपया 89.49 के रिकॉर्ड निचले स्तर पर पहुंचा। विशेषज्ञों का सुझाव है कि यह गिरावट अस्थायी हो सकती है, कच्चे तेल की कीमतों में स्थिरता और आरबीआई के हस्तक्षेप से राहत मिल सकती है। कपड़ा जैसे निर्यात-उन्मुख क्षेत्रों को लाभ, आयात-भारी क्षेत्रों को चुनौती।