Share Market Today: मोठ्या घसरणीनंतर गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात वाढीसह झाली. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी बीएसई (BSE) सेन्सेक्स ३४१.६५ अंकांच्या तेजीसह ७९,४५७.८४ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. त्याच वेळी एनएसई (NSE) चा निफ्टी ९६.२५ अंकांच्या वाढीसह २४,५७६.७५ च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्यानंतर त्यात आणखी वाढ दिसून आली.
सुरुवातीच्या सत्रात निफ्टी इंडेक्समधील काही प्रमुख शेअर्समध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली. सेक्टरल इंडेक्सचा विचार केला तर सर्व क्षेत्रं ग्रीन झोनमध्ये व्यवहार करताना दिसली. ऑटो, ऑईल अँड गॅस, कॅपिटल गुड्स, मेटल, पॉवर आणि रिअल्टी क्षेत्रातील निर्देशांकात सुमारे १% वाढ नोंदवण्यात आली. तसंच निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही मजबूती दिसून आली आणि दोन्ही इंडेक्स सुमारे १.२% वाढीसह व्यवहार करताना दिसले.
इराण तणावादरम्यान रशियानं कच्च्या तेलाचा खजिनाच उघडला; भारत आणि चीनसाठी केली मोठी घोषणा
टॉप गेनर आणि लूझर स्टॉक्स
शेअर बाजारातील व्यवहारादरम्यान निफ्टी इंडेक्समधील काही प्रमुख शेअर्समध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली. श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, एल अँड टी, कोल इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रिज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे, मॅक्स हेल्थकेअर, आयसीआयसीआय बँक, इंटरग्लोब एव्हिएशन, ॲक्सिस बँक आणि ग्रासिम इंडस्ट्रिज यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली आणि हे निफ्टीचे टॉप लूझर्स ठरले.
रुपया ५१ पैशांनी मजबूत
भारतीय रुपया आज सुरुवातीच्या व्यवहारात मजबुतीसह उघडला आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ५१ पैशांची रिकव्हरी नोंदवली. इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये रुपया ९१.५४ प्रति डॉलरच्या पातळीवर व्यवहार करत होता, जो मागील सत्राच्या बंद भावापेक्षा बराच चांगला आहे.
ही रिकव्हरी गेल्या काही दिवसांतील रुपयावरील दबावाच्या परिस्थितीनंतर आली आहे, जिथे जागतिक तेलाच्या किमतीतील वाढ, भू-राजकीय तणाव (उदा. इराण-अमेरिका संबंध) आणि मजबूत डॉलर इंडेक्समुळे रुपया ९२ च्या पातळीच्या जवळ पोहोचला होता. मार्च २०२६ च्या सुरुवातीला रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर राहिला, परंतु आज विदेशी फंडांची एन्ट्री, आशियाई चलनांमधील सुधारणा आणि आरबीआयच्या संभाव्य हस्तक्षेपामुळे रुपयाला पाठबळ मिळालं.
Web Summary : Indian stock markets rebounded strongly. The Sensex climbed 340 points, and Nifty crossed 24,500, boosted by gains in auto, oil & gas, and metal sectors. Rupee strengthened by 51 paise against the dollar amid foreign fund inflows.
Web Summary : भारतीय शेयर बाजार में जोरदार वापसी हुई। सेंसेक्स 340 अंक ऊपर और निफ्टी 24,500 के पार, ऑटो, तेल और गैस और धातु क्षेत्रों में लाभ से बढ़ावा मिला। विदेशी फंड प्रवाह के बीच डॉलर के मुकाबले रुपया 51 पैसे मजबूत हुआ।