Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी ७३% भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट दाखवतोय ₹२५५ चा फायदा, पाहा कोणता आहे आयपीओ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 14:24 IST

ICICI Prudential AMC IPO: आयपीओसाठी दुहेरी आनंदाची बातमी आली आहे. एका बाजूला, हा आयपीओ पहिल्याच दिवशी ७३ टक्के सबस्क्रिप्शन मिळवण्यात यशस्वी झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला ग्रे मार्केटमध्ये या आयपीओने मोठी झेप घेतली आहे.

ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी (ICICI Prudential AMC) आयपीओसाठी (IPO) दुहेरी आनंदाची बातमी आली आहे. एका बाजूला, हा आयपीओ पहिल्याच दिवशी ७३ टक्के सबस्क्रिप्शन मिळवण्यात यशस्वी झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला ग्रे मार्केटमध्ये (Grey Market) या आयपीओने मोठी झेप घेतली आहे. यामुळे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी आयपीओचा जीएमपी (GMP) २५० रुपयांचा टप्पा ओलांडून गेला आहे. हा आयपीओ पुढील आठवड्यात मंगळवार, म्हणजेच १६ डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. हा आयपीओ १२ डिसेंबर रोजी खुला झाला होता.

जीएमपी म्हणजे काय?

इन्व्हेस्टर्सगेनच्या अहवालानुसार, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आयपीओचा जीएमपी आज, शनिवारी, २५५ रुपये आहे. आजचा जीएमपी हा आयपीओची लिस्टिंग २४०० रुपयांच्या वर होण्याचे संकेत देत आहे. ११ डिसेंबरच्या तुलनेत जीएमपीमध्ये १०५ रुपयांची वाढ झाली आहे. १३ डिसेंबर रोजी हा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये आपल्या सर्वात मजबूत स्थितीत आहे.

१०० कोटींचे जेट, १०० कोटींचे घर... लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर

४.९० कोटी शेअर्स जारी होणार

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी आयपीओला पहिल्या दिवशी ७३ टक्के सबस्क्रिप्शन मिळालं आहे. रिटेल श्रेणीत आयपीओला ०.२१ पट, क्यूआयबी (QIB) श्रेणीत १.९७ पट आणि एनआयआय (NII) श्रेणीत ०.३८ पट सबस्क्रिप्शन मिळालं आहे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आयपीओचा आकार १०,६०२.६५ कोटी रुपये आहे. आयपीओद्वारे कंपनी ४.९० कोटी शेअर्स जारी करेल. हे शेअर्स सध्याच्या गुंतवणूकदारांकडून विकले जात आहेत.

प्राइस बँड आणि लॉट

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी आयपीओचा प्राइस बँड २०६१ रुपये ते २१६५ रुपये प्रति शेअर आहे. कंपनीने ६ शेअर्सचा एक लॉट बनवला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमीत कमी १२,९९० रुपये गुंतवावे लागतील. हा मेनबोर्ड आयपीओ आहे, त्यामुळे याची लिस्टिंग बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) मध्ये होईल. या कंपनीची सुरुवात १९९३ मध्ये झाली होती.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : ICICI Prudential AMC IPO: Subscribed 73% on Day One, GMP Soars

Web Summary : ICICI Prudential AMC IPO saw 73% subscription on day one. Its Grey Market Premium (GMP) jumped to ₹255, signaling strong listing. The IPO, with a price band of ₹2061-₹2165, remains open until December 16.
टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूकपैसा