Hindustan Copper : जागतिक बाजारपेठेत तांब्याच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठल्यामुळे देशांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील मिनी-रत्न कंपनी 'हिंदुस्तान कॉपर'च्या शेअरमध्ये गुरुवारी तुफान तेजी पाहायला मिळाली. सलग चौथ्या दिवशी उसळी घेत या शेअरने १८ टक्क्यांच्या वाढीसह ७३६.९ रुपयांचा ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांत या शेअरची किंमत दुप्पट झाली असून कंपनीचे मार्केट कॅप ३०,००० कोटींवरून ७०,००० कोटींच्या पार गेले आहे.
जागतिक बाजारपेठेत तांब्याचा 'भडका'
- हिंदुस्तान कॉपरमधील या तेजीचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील तांब्याचे वाढलेले दर.
- लंडन मेटल एक्सचेंज : येथे तांब्याचे दर ६.७ टक्क्यांनी वधारून १३,९६७ डॉलर प्रति टन या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.
- MCX (भारत) : देशांतर्गत कमोडिटी बाजारात तांब्याचे दर ८.४ टक्क्यांनी वाढून १४३२.३५ रुपये प्रति किलोवर गेले आहेत.
का धावतोय हिंदुस्तान कॉपर?
- नवीन तांब्याच्या खाणी विकसित व्हायला बराच वेळ लागतो आणि सध्या उपलब्ध असलेल्या खनिजाची गुणवत्ता घसरत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने किमती वाढत आहेत.
- जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याने कमोडिटी मार्केटमध्ये तेजी आली आहे.
- ट्रम्प प्रशासनाच्या अस्थिर धोरणांमुळे आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार प्रत्यक्ष मालमत्तांमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत.
- गेल्या तीन महिन्यांत हिंदुस्तान कॉपरमधील किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या २ लाखांनी वाढून ८.३१ लाखांवर पोहोचली आहे.
- जानेवारी महिन्यात या शेअरमध्ये ३६% वाढ झाली आहे, जी २०१२ नंतरची या महिन्यातील सर्वात मोठी कामगिरी आहे.
गुंतवणूकदारांसाठी सल्लातांत्रिक विश्लेषक अंशुल जैन यांच्या मते, हा शेअर सध्या 'हाय मोमेंटम' फेजमध्ये आहे. मात्र, शेअरमध्ये मोठी ओढाताण झाल्यामुळे नफा वसुलीची भीतीही आहे.
वाचा - भाडेकरूनेच हडपलं मालकाचं घर! सासू-सुनेच्या वादात साधला डाव; प्रकरण थेट हायकोर्टात
काय करावे?शेअर विकून बाहेर पडण्यापेक्षा ७०० रुपयांच्या पातळीवर 'ट्रेलिंग स्टॉप लॉस' लावणे हिताचे ठरेल. किंमत जोपर्यंत या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत तेजी कायम राहील. मात्र, अचानक घसरण झाल्यास नफा वसुलीसाठी सज्ज राहावे.
Web Summary : Hindustan Copper shares surged due to rising global copper prices, hitting a 52-week high. The stock doubled in two months, boosting market cap. Analysts advise a trailing stop loss at ₹700 amid potential profit-taking.
Web Summary : वैश्विक तांबे की कीमतों में वृद्धि के कारण हिंदुस्तान कॉपर के शेयर में उछाल आया, जो 52 सप्ताह के उच्च स्तर पर पहुंच गया। दो महीने में स्टॉक दोगुना हो गया, जिससे बाजार पूंजीकरण में वृद्धि हुई। विश्लेषकों ने संभावित लाभ-वसूली के बीच ₹700 पर ट्रेलिंग स्टॉप लॉस की सलाह दी है।