Bonus Share: भारतातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँक लिमिटेडचे शेअर्स बुधवारी फोकसमध्ये आहेत. बँकेचे शेअर्स आज जवळपास १.५ टक्क्यांनी वधारून २०२१.९० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठी घोषणा आहे. शनिवारी, १९ जुलै रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेअर्सच्या बोनस इश्यूवर विचार केला जाईल, अशी माहिती एचडीएफसी बँकेनं बुधवारी, १६ जुलै रोजी शेअर बाजारांना दिली.
एचडीएफसी बँकेच्या भागधारकांसाठी बोनस शेअर्सचा हा पहिलाच इश्यू असेल. शनिवारी बोर्ड जून तिमाहीच्या निकालाचाही विचार करेल. त्याचबरोबर एचडीएफसी बँक संचालक मंडळाच्या बैठकीत विशेष लाभांशाचाही विचार करणार आहे.
३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
तपशील काय?
यापूर्वी २०११ मध्ये बँकेनं १० रुपयांच्या शेअरचे दोन रुपयांच्या पाच शेअर्समध्ये विभाजन केलं आणि नंतर २०१९ मध्ये २ रुपयांच्या त्या शेअरचे १ रुपयांच्या दोन शेअर्समध्ये विभाजन केलं. एचडीएफसी बँकेनं नुकतीच आपल्या आयपीओदरम्यान ऑफर फॉर सेल (OFS) घटकांतर्गत एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसमधील १०,००० कोटी रुपयांचा हिस्सा विकला.
ठेवींमध्ये मोठी वाढ
एचडीएफसी बँकेच्या ठेवींमध्ये जून तिमाहीत जोरदार वाढ झाली. या तिमाहीत ठेवी मागील वर्षाच्या तुलनेत १६.२ टक्क्यांनी आणि क्रमिक १.८ टक्क्यांनी वाढून २७.६४ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या, तर कर्जाची रक्कम वार्षिक आधारावर ६.७ टक्क्यांनी वाढून २६.५३ लाख कोटी रुपये झाली. ही आकडेवारी बँकेनं तिमाही व्यवसाय अपडेटचा एक भाग म्हणून शेअर केली आहे. एचडीएफसी बँकेचा शेअर मंगळवारी ०.८ टक्क्यांनी वधारून १,९९८ रुपयांवर बंद झाला. बँकेच्या शेअरचा५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तर २,०२७ रुपये आहे.