HDFC Bank Stock: एचडीएफसी बँकेच्या शेअर्सच्या किमतीत आज पुन्हा ३ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. सलग चौथ्या दिवशी बँकेच्या शेअर्समध्ये ही घसरण दिसून आली. या ४ दिवसांत एचडीएफसी बँकेच्या शेअर्सचं मूल्य १० टक्क्यांनी घसरलं, ज्यामुळे एचडीएफसी बँकेचं मार्केट कॅप १.३५ लाख कोटी रुपयांनी कमी झालं. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत बँकेच्या शेअर्सचा भाव २५ टक्क्यांनी खाली आलाय.
BSE मध्ये आज सोमवारी बँकेचे शेअर ७६६.९५ रुपयांवर उघडले. काही वेळातच ते ७५०.५५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचले. आज बँकेच्या शेअर्समध्ये एकूण ४ टक्क्यांची घसरण दिसून आली.
सोन्या-चांदीच्या दरात भूकंप, एका झटक्यात सिल्व्हर ₹३१,००० पर्यंत स्वस्त, ₹१३,००० नं आपटलं गोल्ड
अतनु चक्रवर्ती यांचा राजीनामा
बँकेचे पार्ट टाईम अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या दोन वर्षांत बँकेत सुरू असलेली कामं ही मूल्यं आणि नैतिकतेच्या पूर्णपणे विरोधात असल्याचं त्यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केलंय. या राजीनाम्यानंतर HDFC Bank चे एमडी आणि सीईओ श्रीधर जगदीशन यांनी सांगितले की, "अतनु चक्रवर्ती यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. बोर्डाच्या जवळपास प्रत्येक सदस्यानं त्यांच्याशी याबाबत चर्चा केली होती, परंतु त्यांनी आपला निर्णय बदलला नाही."
केकी मिस्त्री यांची अंतरिम अध्यक्षपदी नियुक्ती
HDFC Bank ने एचडीएफसीचे माजी सीईओ केकी मिस्त्री यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर त्यांना हे पद देण्यात आलंय. येत्या काही महिन्यांत बोर्डाच्या अनेक बैठका होणार आहेत. जगदीशन यांनी सांगितलं की, बोर्डाकडून मागील निर्णयांचा पुन्हा आढावा घेतला जाईल, उणिवा ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. बँक जुन्या आणि नवीन सर्व समस्या पारदर्शकपणे सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे.
बँकेची सद्यस्थिती
सध्या HDFC Bank चा PE रेशो १६.४८ आहे, तर प्राईस टू बुक रेशो २.३ आहे. बँकेचा १४-दिवसांचा RSI सध्या २४ वर आहे. RSI ३० च्या खाली येणे याचा अर्थ असा होतो की हे शेअर्स सध्या 'ओव्हरसोल्ड झोन' मध्ये आहेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : HDFC Bank's shares fell for the fourth consecutive day, decreasing market cap by ₹1.35 lakh crore. The stock hit a 52-week low amid the resignation of part-time chairman Atanu Chakraborty and appointment of Keki Mistry. Uncertainty prevails among investors.
Web Summary : HDFC बैंक के शेयर लगातार चौथे दिन गिरे, जिससे मार्केट कैप में ₹1.35 लाख करोड़ की कमी आई। अंशकालिक अध्यक्ष अतनु चक्रवर्ती के इस्तीफे और केकी मिस्त्री की नियुक्ति के बीच स्टॉक 52 सप्ताह के निचले स्तर पर आ गया। निवेशकों में अनिश्चितता व्याप्त है।