Join us

Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:41 IST

: कंपनी गुंतवणूकदारांना १० बोनस शेअर्स देणार आहे. यासाठीची रेकॉर्ड डेट शनिवारी जाहीर करण्यात आली. या स्टॉकबद्दल अधिक जाणून घेऊया.

Harshil Agrotech Ltd Penny Stock: पेनी स्टॉक हर्षिल अ‍ॅग्रोटेक लिमिटेडनं (Harshil Agrotech Ltd) बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी गुंतवणूकदारांना १० बोनस शेअर्स देणार आहे. यासाठीची रेकॉर्ड डेट शनिवारी जाहीर करण्यात आली. या स्टॉकबद्दल अधिक जाणून घेऊया.

रेकॉर्ड डेट याच महिन्यात

कंपनीनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक ३२ शेअर्ससाठी १० शेअर्सचा बोनस मिळेल. कंपनीनं या बोनस इश्यूसाठी १० ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. याचा अर्थ असा की या तारखेला शेअर्स असलेल्या पात्र गुंतवणूकदार बोनस इश्यूसाठी पात्र असतील.

टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण

कंपनीची कामगिरी कशी?

शुक्रवारी बाजार बंद होताना, हर्षिल अ‍ॅग्रोटेक लिमिटेडचे ​​शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक घसरून ₹०.७२ वर बंद झाले. गेल्या वर्षात कंपनीच्या शेअर्सची किंमत ८९ टक्क्यांहून अधिक घसरली आहे. त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹११.७९ आहे आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ₹०.७२ आहे. कंपनीचं मार्केट कॅप ₹२२.४० कोटी आहे.

हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी कठीण असलं तरी, हर्षिल अ‍ॅग्रोटेक लिमिटेडच्या शेअर्सच्या किमतीत दोन वर्षांत २४२ टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, तीन वर्षांत या शेअरने ४१४ टक्के परतावा दिला आहे. पाच वर्षांत हर्षिल अ‍ॅग्रोटेक लिमिटेडच्या शेअर्सच्या किमतीत ११०० टक्के वाढ झाली आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की हर्षिल अ‍ॅग्रोटेक लिमिटेडने १० वर्षांत पोझिशनल गुंतवणूकदारांना २३०० टक्के परतावा दिला आहे.

१० भागांत स्प्लिट

कंपनी पहिल्यांदाच एक्स-बोनस ट्रेडिंग करत असली तरी, हा शेअर आधीच १० भागांमध्ये विभागण्यात आला आहे. २०२४ मध्ये कंपनीचे शेअर्स १० भागांमध्ये विभागण्यात आले होते. त्यावेळी कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू प्रति शेअर ₹१० वरून ₹१ पर्यंत कमी झाली.

(टीप - यामध्ये फक्त शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Penny Stock to Give 10 Bonus Shares: Record Date Announced

Web Summary : Harshil Agrotech Ltd will issue 10 bonus shares for every 32 held, with a record date of October 10. While the stock is down this year, it has risen significantly over the past two and five years, delivering impressive returns to investors. Stock split happened earlier in 2024.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा