Canara Bank Stock Price: केनरा बँकेच्या शेअर्समध्ये सलग सहाव्या दिवशी तेजी कायम राहिली आहे. मंगळवारी BSE वर कॅनरा बँकेचे शेअर्स तेजीसह १२८.४० रुपयांवर पोहोचले. सरकारी बँकेचे शेअर्स मंगळवारी ५२ आठवड्यांच्या नव्या उच्चांकावर (New 52-Week High) गेले. बँकेचे शेअर्स त्यांच्या १४ वर्षांच्या उच्चांकी पातळीच्या (१२९.८५ रुपये) अगदी जवळ पोहोचले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कॅनरा बँकेच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. मार्च महिन्याच्या नीचांकी पातळीपासून बँकेचे शेअर्स ६२ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.
रेखा झुनझुनवालांनी वाढवला हिस्सा
दिग्गज गुंतवणूकदाररेखा झुनझुनवाला यांनी जुलै-सप्टेंबर २०२५ या तिमाहीत कॅनरा बँकेचे अधिक शेअर्स खरेदी केले आहेत. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कॅनरा बँकेचे १४,२४,४३,००० शेअर्स आहेत. सरकारी बँकेत झुनझुनवाला यांचा हिस्सा १.५७ टक्के इतका आहे. जून २०२५ च्या तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कॅनरा बँकेचे १३.२४ कोटी शेअर्स होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकेत झुनझुनवाला यांचा हिस्सा १.४६ टक्के होता.
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
रेखा झुनझुनवाला यांच्या व्यतिरिक्त देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (LIC) देखील कॅनरा बँकेत मोठी गुंतवणूक आहे. LIC कडे या सरकारी बँकेचे ४७,०१,०७,४६८ शेअर्स आहेत. बँकेत एलआयसीचा हिस्सेा ५.१८ टक्के इतका आहे.
५९० टक्क्यांहून अधिक वाढ
कॅनरा बँकेचे शेअर्स गेल्या पाच वर्षांत ५९० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. ९ ऑक्टोबर २०२० रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स १८.४९ रुपयांवर होते. बँकेचे शेअर्स ७ ऑक्टोबर २०२५ रोजी १२८.४० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या चार वर्षांत कॅनरा बँकेच्या शेअर्समध्ये २६१ टक्के वाढ झाली आहे. कॅनरा बँकेचे शेअर्स ३ वर्षांत १८० टक्के उसळलेत. गेल्या दोन वर्षांचा विचार केल्यास बँकेच्या शेअर्समध्ये ७० टक्क्यांहून अधिक तेजी आली आहे. कॅनरा बँकेच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी१२८.४० रुपये आहे, तर ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ७८.५८ रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Canara Bank shares surge, nearing a 14-year high. Rekha Jhunjhunwala increased her stake in the bank during the July-September quarter. The stock has risen significantly, with LIC also holding a substantial investment. Shares have increased over 590% in five years, showcasing strong performance.
Web Summary : केनरा बैंक के शेयर 14 साल के उच्च स्तर के करीब पहुंचे। रेखा झुनझुनवाला ने जुलाई-सितंबर तिमाही में बैंक में अपनी हिस्सेदारी बढ़ाई। एलआईसी का भी बैंक में बड़ा निवेश है। शेयरों में पांच वर्षों में 590% से अधिक की वृद्धि हुई है।