Gold-Silver Price Crash : अर्थसंकल्पाच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किमतींना मोठी गळती लागली आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी सुरू झालेला हा घसरणीचा सिलसिला सोमवारीही कायम राहिला. चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल १५,९४३ रुपयांची विक्रमी घसरण झाली असून सोन्याचे भावही प्रति १० ग्रॅम ४,४३२ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. या पडझडीचा सर्वाधिक फटका 'सिल्वर ईटीएफ' धारकांना बसला असून अनेक फंड २० टक्क्यांच्या जवळ कोसळले आहेत.
कमोडिटी मार्केटमध्ये दरांचे 'कलेक्शन'
- सोमवारी एमसीएक्स वर व्यवहारांना सुरुवात होताच मौल्यवान धातूंचे भाव वेगाने खाली आले.
- चांदी : गेल्या सत्रात २,६५,६५२ रुपयांवर बंद झालेली चांदी थेट २,४९,७१३ रुपये प्रति किलोवर आली.
- सोने : १,४७,७५३ रुपयांवरून सोने कोसळून १,४३,३२१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले.
सिल्व्हर ईटीएफमध्ये २० टक्क्यांची 'त्सुनामी'सोन्या-चांदीच्या वायदा भावातील घसरणीचा थेट परिणाम ईटीएफवर झाला आहे. विशेषतः चांदीच्या फंड्समध्ये मोठी विक्री पाहायला मिळाली.
| सिल्व्हर ईटीएफ | घसरण (%) |
| टाटा सिल्व्हर ईटीएफ | २०.००% |
| कोटक सिल्व्हर ईटीएफ | १५.९०% |
| ग्रो सिल्व्हर ईटीएफ | १५.७६% |
| एसबीआय / एचडीएफसी सिल्व्हर ईटीएफ | १५.५०% |
| आयसीआयसीआय प्रू / निप्पॉन इंडिया सिल्व्हर ईटीएफ | १३.५०% - १५.००% |
गोल्ड ईटीएफमध्येही अस्थिरता : सिल्व्हर ईटीएफच्या तुलनेत गोल्ड ईटीएफमधील घसरण मर्यादित असली तरी बीएसएल गोल्ड ईटीएफ (७.८१%) आणि मोतीलाल ओसवाल गोल्ड ईटीएफ (७.१५%) मध्ये मोठी पडझड नोंदवण्यात आली.
का कोसळले बाजार?रविवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी 'सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स'मध्ये वाढ करण्याची घोषणा केल्याने गुंतवणूकदारांचा मूड बिघडला आहे. शेअर बाजार कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीतील आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली, ज्यामुळे कमोडिटी बाजारात ही मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
Web Summary : Gold and silver prices crashed after the budget announcement. Silver ETFs plummeted nearly 20%. Rising security transaction taxes triggered investor sell-offs across commodities.
Web Summary : बजट घोषणा के बाद सोना और चांदी के दामों में भारी गिरावट। सिल्वर ईटीएफ लगभग 20% तक लुढ़का। बढ़ते सुरक्षा लेनदेन करों के कारण निवेशकों ने कमोडिटी बाजार में बिकवाली की।