Gold Silver Rate : जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे देशांतर्गत सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरांचा अक्षरशः उद्रेक झाला आहे. बुधवारी, ४ फेब्रुवारी रोजी सोन्याने १ लाख ६० हजार रुपयांचा ऐतिहासिक टप्पा पार केला, तर चांदीच्या दरात ६ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली. लग्नसराईच्या काळात दागिन्यांचे दर गगनाला भिडल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.
MCX वर ऐतिहासिक उच्चांकमल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्या-चांदीच्या व्यवहारात मोठी तेजी पाहायला मिळाली. सोने एप्रिल वायदा सोने ४ टक्क्यांहून अधिक वधारून १,६०,७५५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. तर मार्च वायदा चांदी ६ टक्क्यांच्या जोरदार उसळीसह २,८४,०९४ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
जागतिक बाजारपेठेचा प्रभावआंतरराष्ट्रीय स्तरावर स्पॉट गोल्डचे दर २.२ टक्क्यांनी वधारून ५,०४४.७४ डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचा नरम कल आणि येन वगळता इतर चलनांच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती दिली आहे.
महाराष्ट्रासह प्रमुख शहरांतील दर (प्रति १० ग्रॅम)गुड रिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, आजचे दर खालीलप्रमाणे आहेत,| शहर | २४ कॅरेट सोने (₹) | २२ कॅरेट सोने (₹) || मुंबई/पुणे | १,६०,५३० | १,४७,१५० || चेन्नई | १,६२,५६० | १,४९,००० || दिल्ली | १,६०,६८० | १,४७,३०० || कोलकाता | १,६०,५३० | १,४७,१५० || बंगळुरू | १,६०,५३० | १,४७,१५० || अहमदाबाद | १,६०,५८० | १,४७,२०० |
| शहर | २४ कॅरेट सोने (₹) | २२ कॅरेट सोने (₹) |
| मुंबई/पुणे | १,६०,५३० | १,४७,१५० |
| चेन्नई | १,६२,५६० | १,४९,००० |
| दिल्ली | १,६०,६८० | १,४७,३०० |
| कोलकाता | १,६०,५३० | १,४७,१५० |
| बंगळुरू | १,६०,५३० | १,४७,१५० |
| अहमदाबाद | १,६०,५८० | १,४७,२०० |
तेजीची प्रमुख कारणे
- डॉलरचा निर्देशांक घसरल्याने परदेशी गुंतवणूकदारांसाठी सोने खरेदी स्वस्त झाली आहे.
- अमेरिकेतील व्याजदर कपातीची शक्यता आणि सकारात्मक आर्थिक आकडेवारीमुळे सोन्याला बळ मिळाले.
- जागतिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याला आजही गुंतवणूकदारांची पहिली पसंती मिळत आहे.
वाचा - वेदांताचे अनिल अग्रवाल ७५% संपत्ती 'या' क्षेत्रासाठी करणार दान; मुलाच्या स्मरणार्थ घेतला निर्णय
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Gold hits a record ₹1.60 lakh amid global factors, while silver surges 6%. Wedding season rates impact consumers. International markets and a weaker dollar fuel the rally.
Web Summary : वैश्विक कारकों के बीच सोने ने 1.60 लाख रुपये का रिकॉर्ड तोड़ा, चांदी 6% बढ़ी। शादी के सीजन में दरों का असर। कमजोर डॉलर और अंतरराष्ट्रीय बाजार से तेजी।