Gold-Silver vs Equity : शेअर बाजारातील अनिश्चितता आणि जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा 'सोने-चांदी' या सुरक्षित मालमत्तांकडे आपला मोर्चा वळवला आहे. 'असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंड्सच्या तुलनेत गोल्ड आणि सिल्वर ईटीएफमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे.
सोन्याची चांदी, इक्विटीमध्ये सुस्ती!म्युच्युअल फंड क्षेत्रातील आकडेवारी गुंतवणूकदारांच्या बदलत्या मानसिकतेचे दर्शन घडवते. जानेवारी महिन्यात गोल्ड आणि सिल्वर ईटीएफ या दोन्ही प्रकारात मिळून ३३,५०३ कोटींची निव्वळ गुंतवणूक झाली. याच काळात इक्विटी फंड्समध्ये केवळ २४,०१३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी डिसेंबरच्या तुलनेत १४ टक्क्यांनी कमी आहे. एकट्या गोल्ड ईटीएफमध्ये २४,०५० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, जी डिसेंबरमधील ११,६४७ कोटी रुपयांच्या तुलनेत तब्बल दुप्पट आहे.
इक्विटी फंडातील गुंतवणुकीचा वेग मंदावला
- शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे लार्ज-कॅप आणि स्मॉल-कॅप फंडांमधील गुंतवणुकीचा ओघ काहीसा आटला आहे.
- स्मॉल-कॅप फंड : गुंतवणूक कमी होऊन २,९४२ कोटींवर आली.
- मिड-कॅप फंड : गुंतवणूक घटून ३,१८५ कोटींवर आली.
- एसआयपी : दिलासादायक बाब म्हणजे, मासिक एसआयपीचा ओघ ३१,००२ कोटी रुपयांवर स्थिर आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात?तज्ज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि बाजारपेठेतील चढ-उतार यापासून बचाव करण्यासाठी गुंतवणूकदार सोन्याला पसंती देत आहेत. मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची वाढती मागणी आणि मर्यादित पुरवठा यामुळे सोन्याला सातत्याने पाठबळ मिळत आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराने आपल्या पोर्टफोलिओमध्ये १०-१५% सोने ठेवणे आवश्यक आहे. गोल्ड ईटीएफने इक्विटी फंडांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. हे सिद्ध करते की आता सोने आणि चांदी केवळ दागिने म्हणून नाही, तर गुंतवणुकीचे मुख्य साधन म्हणून स्वीकारले जात आहेत."
'गोल्ड ईटीएफ' म्हणजे काय?गोल्ड ईटीएफ म्हणजे सोन्यात केलेली डिजिटल गुंतवणूक. यात तुम्हाला प्रत्यक्ष सोने जवळ बाळगण्याची भीती नसते आणि सोन्याच्या दरातील वाढीचा थेट फायदा मिळतो. हे युनिट्स तुम्ही शेअर बाजारात कधीही विकू शकता.
Web Summary : Amidst market uncertainty, investors are turning to gold and silver ETFs. Gold ETFs saw double the investment compared to December, while equity fund investments slowed. Experts recommend a 10-15% gold allocation in portfolios.
Web Summary : बाजार की अनिश्चितता के बीच, निवेशक सोने और चांदी के ईटीएफ की ओर रुख कर रहे हैं। दिसंबर की तुलना में गोल्ड ईटीएफ में दोगुना निवेश देखा गया, जबकि इक्विटी फंड में निवेश धीमा हो गया। विशेषज्ञ पोर्टफोलियो में 10-15% सोना आवंटित करने की सलाह देते हैं।