Gensol Engineering Ltd: जेनसोल इंजिनीअरिंग लिमिटेडचे शेअर्स सध्या सतत चर्चेत आहेत. कंपनीच्या शेअर्सचं सध्या ट्रेडिंग बंद आहे. यामध्ये शेवटचा व्यवहार २९ सप्टेंबर रोजी झाला होता. त्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं होतं आणि हा शेअर ४१.०५ रुपयांवर आला होता.
संकटातून जात असलेल्या या कंपनीचा शेअर या वर्षात आतापर्यंत ९५% पर्यंत घसरला आहे. या काळात त्याची किंमत ७७२ रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत खाली आली. तसंच, कंपनीचे शेअर गेल्या सहा महिन्यांत ७५% पर्यंत आपटले आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये कंपनीचे शेअर २४०० रुपयांवर होते. म्हणजेच, तेव्हापासून आत्तापर्यंत हा शेअर ९९% पर्यंत कोसळला आहे.
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
काय आहे सविस्तर माहिती?
कंपनीच्या शेअरमधील घसरणीमागे अनेक घटक कारणीभूत आहेत, जसं की नियामक चौकशी, संचालकांचे राजीनामे, वाढलेलं कर्ज आणि इतर आर्थिक अनिश्चितता. एकीकडे कंपनीने सोलर ईपीसी (EPC - Engineering, Procurement, Construction) प्रकल्पांमधून सर्वाधिक महसूल नोंदवला आहे (आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ९६० कोटी रुपये, जो आर्थिक वर्ष २०२३ पेक्षा १४१% अधिक होता). दुसरीकडे, तिला अनेक मोठ्या आरोपांचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच सेबीनं (SEBI) प्रमोटर्स अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांना फंड डायव्हर्जन आणि प्रशासनिक त्रुटींसाठी सिक्युरिटीज मार्केटमध्ये भाग घेण्यापासून निर्बंध लावले आहेत आणि त्यांच्या संचालक पदावर राहण्यासही मनाई केली आहे.
याव्यतिरिक्त, आयआरईडीए (IREDA) सारख्या संस्थागत वित्त संस्थांनी कंपनीविरुद्ध थकबाकी कर्जांमुळे दिवाळखोरीची कार्यवाही देखील सुरू केली आहे. एकंदरीत, जेनसोलची सुरुवात आणि वेगानं विकासाची कहाणी राहिली असली तरी, कंपनीसाठी विश्वास पुन्हा प्रस्थापित करणं आणि कायदेशीर, आर्थिक संरचनेत सुधारणा करणं आवश्यक असल्याचं दिसतं.
कंपनीचा व्यवसाय
जेनसोल इंजिनीअरिंग लिमिटेड ही एक प्रमुख रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील कंपनी आहे, जी विशेषतः सोलर पॉवर प्रोजेक्ट्समध्ये अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) सेवा प्रदान करते. कंपनी मोठ्या प्रमाणावर सोलर प्लांट्सची डिझायनिंग, इंस्टॉलेशन आणि व्यवस्थापन करते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुतंवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Gensol Engineering's share price crashed from ₹2400 to ₹41, leading to trading suspension. Facing regulatory scrutiny and debt issues, the renewable energy company struggles to regain investor confidence after a 99% drop.
Web Summary : Gensol Engineering के शेयर ₹2400 से गिरकर ₹41 पर आने के बाद ट्रेडिंग रोक दी गई। नियामक जांच और कर्ज के मुद्दों का सामना कर रही नवीकरणीय ऊर्जा कंपनी 99% गिरावट के बाद निवेशकों का विश्वास फिर से हासिल करने के लिए संघर्ष कर रही है।