Join us

 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 10:32 IST

Future & Options Trading: शेअर बाजारातील फ्युचर्स अँड ऑप्शन ट्रेडिंगमध्ये (Future & Options Trading) किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठं नुकसान होत आहे.

Future & Options Trading: शेअर बाजारातील फ्युचर्स अँड ऑप्शन ट्रेडिंगमध्ये (Future & Options Trading) किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठं नुकसान होत आहे. बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. सेबीच्या नव्या रिपोर्टनुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षात ९१ टक्के किरकोळ व्यापाऱ्यांना  फ्युचर्स अँड ऑप्शन ट्रेडिंग व्यवहारात १.०६ लाख कोटी रुपयांचा फटका बसल्याचं समोर आलंय.

अभ्यासानुसार, किरकोळ गुंतवणूकदारांचा निव्वळ तोटा आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ४१ टक्क्यांनी वाढून १,०५,६०३ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी ७४,८१२ कोटी रुपये होता. अभ्यासात म्हटलंय की, इक्विटी फ्युचर्स अँड ऑप्शन्स सेगमेंटमधील किरकोळ गुंतवणूकदारांच्या नफा आणि तोट्याच्या विश्लेषणातून असं दिसून येतं की एकूण ९१ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांना आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये निव्वळ तोटा झाला. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्येही असाच ट्रेंड दिसून आला.

डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?

इक्विटी फ्युचर्स अँड ऑप्शन्स सेगमेंटमधील ट्रेडिंगच्या समीक्षेचा भाग म्हणून सेबीनं हे विश्लेषण केलं आहे. या सेगमेंटमधील नियम मजबूत करण्यासाठी आणलेल्या १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू केलेल्या नवीन नियामक उपायांच्या परिणामाचं मूल्यांकन करणं हा त्याचा उद्देश आहे.

गुंतवणूकदारांचे संरक्षण आणि बाजार स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सेबी निर्देशांक फ्युचर्स अँड ऑप्शन्स सेगमेंटच्या व्यापारावर सतत लक्ष ठेवेल असं स्पष्ट केलं आहे. हे उपाय जोखीम टाळण्यासाठी चांगले देखरेख सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं करण्यात आले आहेत.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकसेबी