Swiggy Eternal Shares :शेअर बाजारात आज ऑनलाइन डिलिव्हरी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. 'इटर्नल' आणि 'स्विगी' या कंपन्यांचे शेअर्स आज सुमारे २ टक्क्यांनी घसरले. कर्नाटक सरकारने 'गिग वर्कर्स'च्या कल्याणासाठी लागू केलेल्या नवीन 'वेलफेअर फी'मुळे या कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय आहे कर्नाटक सरकारचा निर्णय?कर्नाटक सरकारने एक अधिसूचना जारी करून गिग वर्कर्सना दिल्या जाणाऱ्या अंतिम पेमेंटवर १ टक्का कल्याण शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शुल्कातून जमा होणारा पैसा गिग वर्कर्सच्या फायद्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या विशेष निधीत जमा केला जाईल. दुचाकीवरून होणाऱ्या प्रत्येक डिलिव्हरीवर १ टक्का फी लागेल. मात्र, येथे प्रति ऑर्डर ५० पैसे अशी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
ग्राहकांचा खिशा कापला जाणार?फूड डिलिव्हरी हा आधीच कमी नफ्याचा व्यवसाय मानला जातो. आता या नवीन शुल्कामुळे कंपन्यांच्या मार्जिनवर अधिक दबाव येणार आहे. या नवीन खर्चामुळे कंपन्यांच्या 'कॉन्ट्रीब्यूशन मार्जिन'वर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कंपन्या हा वाढीव खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. मात्र, बाजारातील तीव्र स्पर्धेमुळे कंपन्या हा खर्च स्वतः सोसतात की ग्राहकांकडून वसूल करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
कंपन्यांची आर्थिक स्थिती आणि ब्रोकरेजचा कलनुकत्याच जाहीर झालेल्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालात दोन्ही कंपन्यांची कामगिरी संमिश्र राहिली आहे.इटर्नल : कंपनीचा निव्वळ नफा ७३ टक्क्यांनी वाढून १०२ कोटी रुपये झाला आहे. महसुलातही २०२ टक्क्यांची मोठी वाढ झाली असून तो १६,३१५ कोटींवर पोहोचला आहे. BNP Paribas India ने या शेअरसाठी ४२० रुपयांचे लक्ष्य दिले आहे.स्विगी : कंपनीचा महसूल ५४ टक्क्यांनी वाढून ६,१४८ कोटी झाला असला, तरी तोटा १०६५ कोटींपर्यंत वाढला आहे. तरीही, मोतीलाल ओसवाल या शेअरबाबत सकारात्मक असून त्यांनी ४४० रुपयांचे लक्ष्य दिले आहे.
वाचा - टाटा स्टीलसह 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट प्राईस(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Karnataka's new welfare fee on gig workers impacts Zomato and Swiggy. Shares fell. Consumers may bear the cost. Eternal's profit rose, Swiggy's loss widened. Mixed brokerage outlook.
Web Summary : कर्नाटक के गिग वर्कर्स पर कल्याण शुल्क से ज़ोमैटो और स्विगी प्रभावित। शेयर गिरे। उपभोक्ताओं पर लागत का बोझ संभव। इटरनल का लाभ बढ़ा, स्विगी का नुकसान बढ़ा। ब्रोकरेज का मिला-जुला दृष्टिकोण।