Join us

बाजी पलटली! अदानीतील भुकंपाचे धक्के आता हिंडनबर्गमध्ये जाणवू लागले; कमाई दर सेकंदाला दोन कोटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 10:34 IST

अदानी दर सेकंदाला दोन कोटी कमवतायत; LIC नेही हात धुवून घेतले

अमेरिकी रिसर्च फर्म हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर आलेला अदानी समुहातील भूकंप आता थांबला आहे. उलट आता हिंडनबर्गला अदानींच्या भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. राजीव जैन यांच्या जीक्यूजी कंपनीने अदानीच्या कंपन्यांत 15 हजार कोटींची गुंतवणूक केल्याची बातमी पसरली आणि अदानींचे शेअर्स कमालीचे वाढू लागले आहेत. एवढे की अदानी सेकंदाला २ कोटींची कमाई करू लागले आहेत. 

अदानी ग्रुपमध्ये एलआयसीची देखील मोठी गुंतवणूक होती. अदानींचा कथित घोटाळा समोर आल्याने विरोधकांनी यावरून मोदी सरकारला टार्गेट करण्यास सुरुवात केली होती. एलआयसीमध्ये सामान्यांचा पैसा असल्याने तो बुडविल्याचा आरोप होत होता. शुक्रवारी सलग तिसर्‍या सत्रामध्ये अदानींचे शेअर्स उसळताच एलआयसीने झालेले नुकसान भरून काढले आहे. तसेच एलआयसीच्या शेअर्समध्ये देखील वाढ झाली आहे. असा दुहेरी फायदा एलआयसीला झाला आहे. 

अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 4 दिवसांत 57% वाढ झाली. तर दानी समूहाचे बाजारमूल्य १.७ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. यामुळे गौतम अदानींच्या मालमत्तेतही वाढ झाली आहे. अदानी ग्रुपच्या समभागांच्या वाढीमुळे शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी गौतम अदानी जगातील सर्वाधिक नफा कमविणारे ठरले आहेत. एका दिवसात त्याच्या संपत्तीत 14 टक्क्यांनी वाढ झाली. हा वेग एवढा होता की दर सेकंदाला अदानी दोन कोटी रुपये कमवत होते. 

गेल्या आठवड्यात अदानी जगातील अब्जाधीशांमध्ये ३७ व्या क्रमांकावर होते. त्यांची संपत्ती आता ४३ अब्ज डॉलर एवढी झाली असून ते आता २६ व्या क्रमांकावर आहेत. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस अदानीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होती. या आठवड्यातही झपाट्याने शेअर्स वाढतील अशी अपेक्षा आहे.  

टॅग्स :अदानीगौतम अदानीशेअर बाजार