Join us

व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 11:58 IST

Donald Trump : अमेरिकेला केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर देशांतर्गत पातळीवरही अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे इराण आणि इस्रायलमध्ये तणाव आहे. दुसरीकडे, भारतासह जगभरातील देशांशी व्यापार करार आहेत. त्यामुळे भारतासमोर अमेरिकेची भूमिका थोडी कमकुवत झाली आहे.

Donald Trump : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादल्यानंतर पहिल्यांदाच भारत आणि अमेरिकेत व्यापारी करार होणार आहे. मात्र, त्याआधीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या डॉलरला मोठा धक्का बसला आहे, तर दुसरीकडे भारतीय रुपयाने मोठी झेप घेतली आहे. गेल्या काही महिन्यांतील सर्वात कमी पातळीवर डॉलर घसरला असून, रुपयाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. या बदलाचा थेट फायदा भारताच्या अर्थव्यवस्थेला होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रुपयाची जोरदार वाढ: डॉलर का घसरला?मंगळवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ४२ पैशांनी मजबूत होऊन ८५.३४ वर पोहोचला. सोमवारी रुपया ८५.७६ वर बंद झाला होता.

रुपयाच्या या वाढीमागे दोन प्रमुख कारणे आहेत

  1. डॉलर निर्देशांक घसरला: सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक (Dollar Index) ०.१७ टक्क्यांनी घसरून ९६.७१ वर आला आहे. हा निर्देशांक अनेक महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. या घसरणीमागे अमेरिकेतील राजकीय गोंधळ कारणीभूत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेच्या सेंट्रल बँकेवर (फेडरल रिझर्व्ह) वाढता प्रभाव आणि फेड चेअर पॉवेल यांना बदलण्याच्या त्यांच्या योजनेमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे, ज्यामुळे डॉलर कमकुवत झाला आहे.
  2. कच्च्या तेलाच्या किमती कमी: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत (ब्रेंट क्रूड ऑइल) प्रति बॅरल ६७.६१ अमेरिकन डॉलरवर आली आहे. यामुळे भारताचे आयात बिल कमी होईल आणि देशातील महागाई नियंत्रणात राहण्यास मदत होईल. याचा थेट फायदा रुपयाला मिळत आहे.

शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेची स्थितीएकीकडे रुपया मजबूत होत असताना, देशांतर्गत शेअर बाजारातही किंचित वाढ दिसून आली. सेन्सेक्स २००.९२ अंकांनी वाढून ८३,८०७.३८ वर पोहोचला, तर निफ्टी ५७.८५ अंकांनी वाढून २५,५७४.९० वर पोहोचला. मात्र, परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) शेअर बाजारातून ८३१.५० कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

इतर आर्थिक आकडेऔद्योगिक उत्पादन घटले: मे २०२५ मध्ये देशाचे औद्योगिक उत्पादन नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, म्हणजेच १.२ टक्क्यांवर घसरले. मान्सून लवकर सुरू झाल्यामुळे उत्पादन, खाणकाम आणि वीज क्षेत्राच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचे दिसून आले.राजकोषीय तूट नियंत्रणात: मे महिन्याच्या अखेरीस केंद्र सरकारची राजकोषीय तूट संपूर्ण वर्षाच्या उद्दिष्टाच्या ०.८ टक्के राहिली आहे. रिझर्व्ह बँकेकडून मिळालेल्या २.६९ लाख कोटी रुपयांच्या लाभांशामुळे हे शक्य झाले आहे.

वाचा - मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?

एकंदरीत, डॉलरची घसरण आणि कच्च्या तेलाच्या कमी किमती यामुळे रुपयाला मोठा आधार मिळाला असून, याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होऊ शकतो.

टॅग्स :टॅरिफ युद्धडोनाल्ड ट्रम्पअमेरिकाभारतनरेंद्र मोदी