Dividend Stock Muthoot Finance: मुथुट फायनान्स लिमिटेडनं पुन्हा एकदा आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं यावेळेस एका शेअरवर ३० रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे. या लाभांशासाठी कंपनीकडून रेकॉर्ड डेटची माहिती देखील देण्यात आली असून ती पुढील आठवड्यातच आहे.
रेकॉर्ड डेट कधी आहे?
Muthoot Finance Ltd नं स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक शेअरवर ३० रुपयांचा लाभांश दिला जाईल. या लाभांशासाठी कंपनीनं १७ एप्रिल २०२६ ही तारीख 'रेकॉर्ड डेट' म्हणून निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, कंपनी या वर्षात पहिल्यांदाच एक्स-डिव्हिडंड (Ex-dividend) व्यवहार करणार आहे.
कंपनी १९ व्यांदा देणार लाभांश
या कंपनीने पहिल्यांदा २०१२ मध्ये लाभांश दिला होता, तेव्हा एका शेअरवर ४ रुपये वाटण्यात आले होते. २०१३ मध्ये कंपनीने प्रति शेअर ४.५ रुपये लाभांश दिला होता. शेवटच्या वेळी Muthoot Finance Ltd चे शेअर्स २५ एप्रिल २०२५ रोजी एक्स-डिव्हिडंड ट्रेड झाले होते, तेव्हा कंपनीने प्रत्येक शेअरवर २६ रुपये लाभांश दिला होता. दरम्यान, कंपनीने आतापर्यंत एकदाही गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिलेले नाहीत.
शेअर्सची कामगिरी कशी आहे?
शुक्रवारी बीएसईवर बाजार बंद होताना हा स्टॉक २ टक्क्यांहून अधिक वाढीसह ३५७२.५५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. गेल्या एका आठवड्यात कंपनीच्या शेअरच्या किमतीत १२.४१ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर गेल्या ६ महिन्यांत या स्टॉकनं १३.१३ टक्के परतावा दिलाय. गेल्या एका वर्षाचा विचार केल्यास शेअरच्या किमतीत ६६ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली. कंपनीच्या शेअर्सचा बीएसईमधील ५२ आठवड्यांचा उच्चांक (52 Week High) ४१४९ रुपये आणि नीचांक (52 Week Low) १९६४.३५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १.४३ लाख कोटी रुपये आहे.
१० वर्षांत १८९६ टक्क्यांची मोठी झेप
गेल्या दोन वर्षांत Muthoot Finance Ltd नं ११६ टक्के परतावा दिलाय. तीन वर्षांत कंपनीच्या शेअरचा भाव २४७ टक्क्यांनी वाढलाय. तसंच, ज्या गुंतवणूकदारांनी १० वर्षांपासून हे शेअर्स होल्ड केलेत त्यांना आतापर्यंत १८९६ टक्के इतका प्रचंड नफा मिळालाय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Muthoot Finance announces ₹30 dividend per share, record date April 17, 2026. The company will pay dividend for the 19th time. Stock sees surge, delivering substantial returns over past years.
Web Summary : मुथूट फाइनेंस ने ₹30 प्रति शेयर डिविडेंड की घोषणा की, रिकॉर्ड तिथि 17 अप्रैल, 2026 है। कंपनी 19वीं बार डिविडेंड देगी। स्टॉक में उछाल, पिछले वर्षों में अच्छा रिटर्न दिया।