Cupid Share Price: क्यूपिडच्या (Cupid) शेअर्सनी मंगळवारी जबरदस्त पुनरागमन करत ११ टक्क्यांपर्यंत झेप घेतली. इंट्राडे दरम्यान हा शेअर ४३३ रुपयांवर पोहोचला. गेल्या दोन दिवसांतील मोठ्या घसरणीनंतर ही तेजी पाहायला मिळाली आहे. गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये सुमारे २५ टक्क्यांनी घसरलेल्या या मल्टिबॅगर शेअरमध्ये पुन्हा एकदा खरेदीचा उत्साह दिसून आला. ही कंपनी महिला आणि पुरुषांसाठी कंडोम, वॉटर बेस्ड लुब्रिकंट्स, आयव्हीडी किट्स इत्यादींची निर्मिती करते.
मंगळवारी दुपारी १२:३० वाजता बीएसईवर (BSE) क्यूपिडचे शेअर्स ८.६८% वाढीसह ४२३.९५ रुपयांवर व्यवहार करत होते. इंट्राडेमध्ये ४३३ रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर त्यात किंचित घट झाली. 'शॉर्ट कव्हरिंग' आणि कंपनीच्या लाँग टर्म फंडामेंटल्सवर गुंतवणूकदारांचा विश्वास परतल्यामुळे ही तेजी आली आहे. तसेच, आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीतील बिझनेस अपडेटनं व्यवसायाची गती आणि मागणीचं सकारात्मक चित्र स्पष्ट केलंय.
नुकतीच झाली होती मोठी घसरण
क्यूपिडच्या शेअर्समध्ये अलीकडेच मोठी घसरण झाली होती. २ जानेवारी रोजी कंपनीचा शेअर सुमारे २० टक्क्यांनी कोसळला होता. या घसरणीनंतर कंपनीला स्टॉक एक्स्चेंजला स्पष्टीकरण द्यावं लागलं. क्यूपिड लिमिटेडने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, शेअरची किंमत किंवा ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये झालेल्या असामान्य हालचालीसाठी कारणीभूत ठरेल अशा कोणत्याही 'अनडिस्क्लोज्ड' घटनेची किंवा घडामोडीची त्यांना माहिती नाही.
६ महिन्यांत गुंतवणूकदार मालामाल
कंपनीच्या शेअर्सनी केवळ ३ महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. तर गेल्या ६ महिन्यांतील परतावा अत्यंत जबरदस्त आहे. ६ महिन्यांत या शेअरमध्ये सुमारे ३०० टक्क्यांची वाढ झाली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ६ महिन्यांपूर्वी यात १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्या रकमेचे मूल्य सुमारे ४ लाख रुपये झालं असतं.
वर्षाभरात गुंतवणूक पाच पटीने वाढली
एका वर्षातील या शेअरची कामगिरी अधिकच प्रभावी राहिली आहे. वर्षभरात यात ४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एका वर्षापूर्वी या शेअरची किंमत ८० रुपयांपेक्षा कमी होती, जी आता सुमारे ४२४ रुपये आहे. अशा प्रकारे एका वर्षात या शेअरने ४३२ टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच एका वर्षापूर्वीच्या १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर आता ५.३२ लाख रुपयांमध्ये झालं आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Cupid's shares rebounded strongly, rising up to 11%. Investor confidence and strong business updates drove the surge. The stock doubled in three months and increased by 300% in six months, turning ₹1 lakh into ₹4 lakh.
Web Summary : क्यूपिड के शेयरों में जोरदार उछाल आया, जो 11% तक बढ़ गया। निवेशकों के विश्वास और मजबूत कारोबारी अपडेट ने तेजी को बढ़ावा दिया। स्टॉक तीन महीने में दोगुना और छह महीने में 300% बढ़ा, जिससे ₹1 लाख ₹4 लाख में बदल गया।