Join us

४-६ महिन्यात होईल मोठी कमाई! एक्स्पर्ट्सनं सांगितला Mahindra Groupचा हा स्टॉक; पाहा टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 13:39 IST

बाजार चांगली कामगिरी करत नसतानाही असे काही स्टॉक्स आहेत जे चांगली कामगिरी करतायत.

बुधवारी शेअर बाजारात थोडी घसरण दिसून आली. बाजार चांगली कामगिरी करत नसतानाही असे काही स्टॉक्स आहेत जे चांगली कामगिरी करतायत. असाच एक स्टॉक मार्केट एक्स्पर्ट संदीप जैन यांच्या रडारवर आहे, ज्यावर ते बुलिश आहेत. गुंतवणूकदार या शेअरमध्ये अल्प ते दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करू शकतात. तुम्हालाही बाजारातील चढ-उतारात मोठी कमाई करायची असेल, तर तुम्हीही हा शेअर खरेदी करू शकता, असं संदीप जैन म्हणाले.

संदीप जैन म्हणाले की, स्वराज इंजिननं (Swaraj Engine) जून तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. महिंद्रा ग्रुपची मोठी कंपनी आहे. हा स्टॉक तिसऱ्यांदा कव्हर करत असल्याचंही त्यांनी सांगितले. महिंद्रा समूहाचा कंपनीत 52 टक्के हिस्सा आहे. कंपनी 1989 पासून कार्यरत आहे. त्याचे प्रकल्प पंजाबमध्ये आहेत. कंपनीचा प्रमुख व्हॉल्युम इंजिन आणि स्पेअर पार्ट्समधून येत असल्याचंही ते म्हणाले. त्यांनी स्वराज इंजिनच्या शेअरसाठी चार ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी 2190-2250 रुपयांचं टार्गेट दिलंय.

फंडामेंटल मजबूतस्वराज इंजिनचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. या शेअरचे रिटर्न ऑन इक्विटी 41 टक्के आहे. डिव्हिडंड यील्डही खूप मजबूत असून ते 4.7 टक्के आहे. मागील 3 वर्षातील विक्रीचा CAGR 22-23 टक्के आहे. जून तिमाहीत कंपनीला 41 कोटी रुपयांचा नफा झाला. या शिवाय ही एक झीरो डेट कंपनी आहे. शेअरचं व्हॅल्यूएशन खूप स्वस्त आहे. शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत असल्याचं संदीप जैन म्हणाले.

(टीप - यामध्ये देण्यात आलेले तज्ज्ञांचे विचार हे त्यांचे वैयक्तिक विचार आहे. यात शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा