Defence Sector : देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी क्षेपणास्त्रे आणि आवश्यक शस्त्र प्रणाली बनवणाऱ्या भारत डायनॅमिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. १३ नोव्हेंबरनंतर कंपनीला २,४६१.६२ कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्या आहेत. या ऑर्डर्समध्ये टँक-विरोधी गाईडेड क्षेपणास्त्रे आणि जमिनीवरून हवाई संरक्षण करणारी क्षेपणास्त्रे यांचा समावेश आहे. या ऑर्डर्सला सरकारने आपत्कालीन खरेदी अंतर्गत मंजुरी दिली आहे. BDL ही भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी सर्वात महत्त्वाची शस्त्र प्रणाली बनवणारी सरकारी कंपनी आहे.
तिमाही आणि सहामाहीतील जबरदस्त कामगिरीकंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या दुसऱ्या तिमाहीच्या (जुलै-सप्टेंबर २०२५) निकालात उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षाच्या तुलनेत ७६.२% वाढून २१५.८८ कोटी रुपये झाला आहे. तसेच, कंपनीची एकूण कमाई (रेव्हेन्यू) ११०.५५% वाढून १,१४७.०३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे कंपनीने दीडपटाहून अधिक कमाई करत शानदार कामगिरी केली आहे. खर्च वाढून ९७९.९८ कोटींपर्यंत पोहोचला असला तरी, कमाई जास्त वाढल्याने ऑपरेटिंग नफा ८९.४% नी वाढून १८८ कोटी रुपये झाला.
या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर २०२५) देखील BDL ची कामगिरी चांगली राहिली. कंपनीचा नफा मागील वर्षाच्या तुलनेत ८०.५% वाढून २३४.२३ कोटी रुपये झाला, तर एकूण कमाई जवळपास दुप्पट होऊन १,३९४.९६ कोटींवर पोहोचली. संरक्षण क्षेत्रातील मोठे ऑर्डर आणि आत्मनिर्भर भारतच्या मोहिमेमुळे कंपनीला मोठा फायदा होत असल्याचे या निकालांवरून स्पष्ट होते.
BDL च्या शेअर्सची स्थितीबीडीएलचेचे शेअर्स सोमवारी BSE वर १.०३% च्या वाढीसह १,५२९.५० रुपयां वर बंद झाले.कंपनीच्या शेअर्सनी गेल्या ५ वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल ८३९.०३% चा बंपर नफा दिला आहे. याशिवाय, एका वर्षात ७.३२% आणि तीन वर्षांत ३५.३३% चा मजबूत रिटर्न दिला आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Bharat Dynamics secures ₹2,461 crore order for missiles. Q2 profit jumps 76.2%, revenue up 110.55%. 'Make in India' boosts growth, shares rise.
Web Summary : भारत डायनेमिक्स को मिसाइलों के लिए ₹2,461 करोड़ का ऑर्डर मिला। Q2 का मुनाफा 76.2% बढ़ा, राजस्व 110.55% बढ़ा। 'मेक इन इंडिया' से विकास को बढ़ावा, शेयर बढ़े।