Join us

अनिल अंबानींच्या 'या' कंपनीने वर्षभरात दुप्पट केले पैसे; तुमच्याकडे आहे का हा शेअर..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 14:17 IST

Anil Ambani: अनिल अंबानींची ही कंपनी कर्जमुक्त झाली असून, आता वेगाने वाटचाल करत आहे.

Anil Ambani: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने गेल्या एका वर्षात शेअर बाजारात खळबळ उडवून दिली आहे. कंपनीच्या शेअर्सनी वर्षभरात १०१% चा परतावा दिला आहे, म्हणजेच गुंतवणूकदारांचे पैसे एका वर्षातच दुप्पट झाले. या तेजीमागील कारण म्हणजे, कंपनीचा कर्जमुक्त बॅलन्स शीट, क्रेडिट रेटिंगमध्ये प्रचंड वाढ आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील दमदार उपस्थिती. 

१०१% परतावा; गती कायम राहील ?

रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स मंगळवारी एनएसईवर ०.३% च्या किंचित घसरणीसह ३८८.१५ रुपयांवर बंद झाले. गेल्या आठवड्यात, क्रेडिट रेटिंग अपग्रेड आणि निधी उभारणीच्या बातम्यांनी शेअरला आधार दिली, त्यानंतर हा ४.७% वाढला. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत हा शेअर ५३.३%, सहा महिन्यांत ४२% आणि या वर्षी आतापर्यंत २२.५% ने वाढला आहे. तांत्रिक चार्टनुसार, हा शेअर अजूनही त्याच्या सर्व ८ प्रमुख मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर व्यवहार करत आहे. याचा अर्थ असा की, शेअरमधील तेजीचा कल अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही काळात कायम आहे.

क्रेडिट रेटिंग वाढ, कर्जमुक्त बॅलन्स शीटरिलायन्स इन्फ्राच्या तेजीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे, कंपनीचे बदललेले आर्थिक धोरण. गेल्या आठवड्यात इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने कंपनीचे क्रेडिट रेटिंग 'IND D' वरून 'IND B/Stable/IND A4' असे अपग्रेड केले. हे तीन अंकांचे अपग्रेड आहे, ज्यामुळे कंपनी सहा वर्षांनंतर 'डिफॉल्ट' श्रेणीतून बाहेर आली. कंपनीने तिच्या फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, "हे अपग्रेड कर्जमुक्त होण्याच्या आणि बॅलन्स शीट मजबूत करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांचे परिणाम आहेत. आता बँका आणि वित्तीय संस्थांकडे आमचे शून्य कर्ज आहे." 

कंपनीच्या संचालक मंडळाची १६ जुलै रोजी बैठक कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवार, १६ जुलै रोजी होणार आहे, ज्यामध्ये दीर्घकालीन निधी उभारण्यासाठी अनेक पर्यायांचा विचार केला जाईल. यामध्ये QIP, इक्विटी-लिंक्ड सिक्युरिटीज आणि NCDs यांचा समावेश आहे. ही बैठक FY26 च्या पहिल्या तिमाहीच्या निकालांपूर्वी होत आहे, ज्यामध्ये कंपनी तिची नवीनतम आर्थिक स्थिती आणि भांडवली आवश्यकता स्पष्ट करू शकते.

याशिवाय, कंपनीला अलीकडेच ५,००० कोटी रुपयांचा संरक्षण करार मिळाला आहे. हा एक विमान अपग्रेड कार्यक्रम आहे, जो रिलायन्स इन्फ्रा खाजगी क्षेत्रातील पहिली भारतीय कंपनी म्हणून हाताळेल. हा प्रकल्प ७-१० वर्षांत पूर्ण होणार आहे, जो कंपनीच्या दीर्घकालीन वाढीला आधार देईल.

नफ्यात मोठी वाढकंपनीने आर्थिक वर्ष २५ च्या चौथ्या तिमाहीत उत्कृष्ट निकाल सादर केले. रिलायन्स इन्फ्राने मागील तिमाहीत ३,२९८ कोटी रुपयांचा तोटा असताना ४,३८७ कोटी रुपयांचा एकत्रित नफा नोंदवला. समायोजित EBITDA ६८१% वाढून ८,८७६ कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीची निव्वळ संपत्ती ४४% वाढून १४,२८७ कोटी रुपयांवर पोहोचली. तसेच, कंपनीने स्वतंत्र आधारावर ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज कमी करून शून्य कर्जाचे लक्ष्य गाठले.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :अनिल अंबानीशेअर बाजारशेअर बाजाररिलायन्स