Join us

अर्थमंत्र्यांची एक घोषणा आणि आपटले सिगारेट कंपन्यांचे शेअर्स; स्टॉक्समध्ये मोठी विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 15:16 IST

Cigarette Stocks Crash after budget : अर्थमंत्र्यांनी निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला.

Cigarette Stocks Crash after budget : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांना थोडा दिलासा देणाऱ्या काही घोषणाही केल्या. परंतु अर्थमंत्र्यांच्या एका घोषणेनंतर मात्र शेअर बाजारात सिंगरेट कंपन्यांचे शेअर आपटल्याचं दिसून आलं.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सिगारेटवरील टॅक्स वाढवण्याची घोषणा केली. यानंतर बीएसईवर गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड (Godfrey Phillips India Limited) आणि आयटीसी लिमिटेड (ITC Share Limited) सह अन्य सिगारेट कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. या कंपन्यांचे शेअर पाच टक्क्यांपर्यंत घसरले.

या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरणबीएसईवर गॉडफ्पे फिलिप्सच्या शेअरमध्ये जवळपास ४.९२ टक्क्यांची घसरण होऊन तो १८२८.७५ रुपयांवर आला. तर गोल्डन टोबॅकोच्या शेअरमध्ये ३.८१ टक्क्यांची घसरण झाली आणि शेअर ५९.४ रुपयांवर आला. तर आयटीसीचा शेअर ०.७८ टक्क्यांनी घसरून ३४९ रुपयांवर आला होता. एमटीसी इंडस्ट्रीजचा शेअर १.४ टक्क्यांपर्यंत घसरला, तर बीएसटी इंडस्ट्रीजचा शेअर ०.३५ टक्क्यांनी घसरला.

काय घोषणा केली?आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांनी सिगारेटवरील टॅक्स वाढवण्याची घोषणा केली. सिगारेटवरील टॅक्समध्ये तब्बल १६ टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

टॅग्स :निर्मला सीतारामनअर्थसंकल्प 2023शेअर बाजार