Ambani-Adani : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या(1 फेब्रुवारी 2025) रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे. दरम्यान, सरकारने 1 फेब्रुवारी 2024 रोजी गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी आशिया आणि भारतातील दोन श्रीमंत उद्योगपतींची संपत्ती प्रचंड प्रमाणात होती. 100 बिलियन डॉलर क्लबमध्ये मुकेश अंबानी होते, तर गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सपासून काही पावले दूर उभे होते. पण, आता एक वर्ष उलटले असून, या दोन्ही अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. एका वर्षात मुकेश अंबानी 100 बिलियन डॉलर क्लबमधून बाहेर पडले आहेत. ते जगातील टॉप 15 श्रीमंतांच्या यादीत नाहीत. तर, गौतम अदानी यांच्या संपत्तीतदेखील मोठी घट झाली आहे. ते तर टॉप 20 क्लबमधून बाहेर पडले आहेत.
शेअर बाजाराबद्दल बोलायचे, तर आज अर्थसंकल्प सादर होण्याच्या अदल्या दिवशी शेअर बाजारात तेजी आली आहे. या तेजीचा परिणाम या दोन्ही अब्जाधीशांच्या संपत्तीवर दिसून आला आहे. म्हणजेच, अर्थ अर्थसंकल्पाच्या दिवशी या दोघांच्या संपत्तीत वाढ पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे.
मुकेश अंबानींच्या संपत्तीत किती घट?
आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स डेटानुसार, 1 फेब्रुवारी 2024 रोजी मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती $106 अब्ज होती. 31 मार्च 2025 पर्यंत, $16 अब्ज म्हणजेच 1.38 लाख कोटी रुपये कमी झाले आहेत. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत एका वर्षात 15 टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 90 अब्ज डॉलर्स आहे. याचा अर्थ 100 अब्ज डॉलर क्लबमधून ते बाहेर फेकले गेले आहेत. सध्या ते जगातील 17 वे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत.
गौतम अदानी यांचेही मोठे नुकसान
गेल्या अर्थसंकल्पापासून गेल्या वर्षभरात गौतम अदानींना मोठा फटका बसला आहे. जगातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीतूनही ते बाहेर पडले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स डेटानुसार, 1 फेब्रुवारी 2024 रोजी गौतम अदानी यांची संपत्ती $96.8 अब्ज होती. जे कमी होऊन 698 अब्ज डॉलर झाली आहे. याचा अर्थ आतापर्यंत गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीपैकी 28 टक्के म्हणजे 27 अब्ज डॉलर्स बुडाले आहेत. सध्या अदानी जगातील 21 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत.
अर्थसंकल्पाच्या दिवशी संपत्ती वाढेल
अर्थसंकल्पाच्या दिवशी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ होणार की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात विकासावर भर दिला जाऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे शेअर बाजारात तेजी दिसून येईल. अदानी समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये तेजीचे वातावरण राहिल्यास दोघांच्याही संपत्तीत वाढ होईल.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)