Join us

३३ वर्ष जुन्या कंपनीचा येणार IPO, १३०० पेक्षा अधिक क्लायंट्स; पाहा कोणती आहे ही कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 15:15 IST

आयटी/आयटीईएस, ऑटोमोबाईल, लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंग, एअरपोर्ट अशा अनेक क्षेत्रांमध्ये कंपनीचे ग्राहक आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे आयपीओ आले आहेत. अनेक लहान मोठ्या कंपन्यांनी आयपीओ आणलेत. पण आता इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी अपडेटर सर्व्हिसेस लिमिटेडही आपला आयपीओ आणणार आहे. आयपीओद्वारे फंड उभारण्यासाठी बाजार नियामक सेबीनं कंपनीला मंजुरी दिली आहे.

या आयपीओमध्ये ४०० कोटी रुपयांपर्यंत नवे इक्विटी शेअर्स आणि प्रवर्तकांशिवाय विद्यमान शेअरधारकांचे १.३३ कोटींचे इक्विटी शेअर्सचा ओएफएस यांचा समावेश असेल. अपडेटर सर्व्हिसेस लिमिटेडनं मार्च महिन्यात बाजार नियामक सेबीकडे मसुदा पत्र सादर केलं होतं. कंपनीला ४ सप्टेंबर रोजी सेबीची मंजुरी मिळाली. IIFL सिक्युरिटीज लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इनव्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

कंपनीची स्थापन १९९० मध्ये रघुनंदन तांगिरला यांनी केली होती. ही ३३ वर्षे जुनी कंपनी आहे. या कंपनीचे १३०० पेक्षा अधिक  ग्राहक आहेत. यामध्ये एफएमजीसी, मॅन्युफॅक्चरिंग अँड इंजिनिअरिंग, बीएफएसआय, हेल्थकेअर, आयटी/आयटीईएस, ऑटोमोबाईल, लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंग, एअरपोर्ट, पोर्ट्स यांसारख्या क्षेत्रात ग्राहक आहेत. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीला १४८३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. तसंच त्यांच्या नफ्यातही वाढ होऊन तो ५७.४ कोटी रुपये झाला.(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारसेबी