Join us

२०२५ मध्ये कुठे गुंतवणुकीवर मिळेल बंपर परतावा? सोने, चांदी, म्युच्युअल फंड, शेअर्स की रिअल इस्टेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 10:17 IST

investment in 2025 : सरते वर्ष २०२४ मध्ये सोने आणि चांदीने शेअर मार्केटपेक्षाही खूप चांगला परतावा दिला. तुम्ही तर पुढील वर्षाचे नियोजन करत असाल तर नवीन वर्षात अशी स्थिती राहील का? हे माहीत असणे आवश्यक आहे.

investment in 2025 : प्रत्येकजण नववर्षाच्या स्वागताच्या तयारीत गुंतलेला आहे. नवीन वर्षात अनेक संकल्प आणि योजना मनात घोळत असतील. जर तुम्ही २०२५ साठी गुंतवणुकीचे नियोजन करत असाल, तर शक्य तितक्या लवकर बचतीनुसार योग्य गुंतवणूक माध्यम निवडणे आवश्यक आहे. २०२४ मध्ये सोने आणि चांदी यांसारख्या सुरक्षित गुंतवणुकींनी शेअर्सपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये २५ डिसेंबरपर्यंत, सोन्याने गुंतवणूकदारांना २५.२५% चा उत्कृष्ट परतावा दिला आहे तर चांदीने २३.११% चा उत्कृष्ट परतावा दिला आहे. शेअर मार्केटबद्दल बोलायचं झालं तर BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी ५० ने या कालावधीत ९% परतावा दिला आहे. त्यामुळे नवीन वर्षात सोने, चांदी, म्युच्युअल फंड, शेअर्स किंवा रिअल इस्टेट अशा कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणे योग्य राहील? 

सोने आणि चांदीमध्ये परतावा कमी राहीलतज्ज्ञांचे म्हणणे आहे की सध्याच्या भू-राजकीय तणावाचा परिणाम २०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थांवर कमी होऊ शकतो. त्याचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून येईल. २०२४ च्या तुलनेत सोने आणि चांदीमध्ये कमी परतावा मिळू शकतो. गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओपैकी १० टक्के सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करू शकतात. सोने आणि चांदीमध्ये कमी जोखीम घेऊन चांगले परतावा देण्याची क्षमता आहे.

लार्ज कॅप म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करा स्टॉक मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की २०२५ च्या मल्टी-ऍसेट स्ट्रॅटेजीमध्ये, लहान ते मध्यम मुदतीसाठी मिड-कॅप आणि स्मॉल-कॅपऐवजी लार्ज-कॅप स्टॉकवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण मिड-कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सचे मूल्यांकन अजूनही उच्च आहे. गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप म्युच्युअल फंड आणि लार्ज कॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी. या वर्षी लार्ज कॅप शेअर्समध्ये चांगल्या परताव्याची अपेक्षा आहे. गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप इक्विटीमध्ये ६०%, कर्जामध्ये ३०% आणि सोन्यात १०% गुंतवणूक करावी.

रिअल इस्टेट क्षेत्र निराश करू शकते जर तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे. बाजारातील मालमत्तेची किंमत विक्रमी उच्चांकावर आहे. स्वस्त फ्लॅट किंवा दुकान आता उपलब्ध नाही. आलिशान मालमत्तेची किंमत करोडोंमध्ये आहे. चढ्या किमतीत खरेदी केलेल्या मालमत्तेचे खरेदीदार फारच कमी आहेत. त्यामुळे, या वर्षी तुम्ही लक्झरी मालमत्तेवर उत्तम परताव्याची अपेक्षा करत असाल तर तुमच्या पदरी निराशा येण्याची शक्यता आहे. तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागेल. हा, पण जर तुम्ही जमीन खरेदी केली तर हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय असेल. 

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजारबांधकाम उद्योग