Join us

मुलांच्या शिक्षणाची सतावतेय चिंता? 'या' आहेत ४ सर्वोत्तम योजना, खर्चाची काळजीच मिटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:18 IST

childrens education : प्रत्येक पालकाला आपल्या मुलांना चांगले भविष्य द्यायचे असते. यासाठी त्यांना चांगल्या शाळेत शिकायला पाठवणे आवश्यक आहे. त्यासाठी आत्तापासूनच आर्थिक तरतूद करायला सुरुवात करा.

childrens education : काही दिवसांपूर्वी पुणे शहरात सहज प्ले ग्रुपच्या फीची चौकशी केली तर ३० हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत सांगण्यात आले. यावरुन प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणशुल्काचा तुम्हाला अंदाज आला असेल. सध्याच्या काळात पालकांचा सर्वाधिक खर्च हा मुलांच्या शिक्षणावर होत असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणासाठी आतापासून तरतूद करणे आवश्यक झाले आहे.

सध्या हायस्कूलची फी, गणवेश आणि महागडी पुस्तके यामुळे बहुतांश पालक अडचणीत आले आहेत. दरवर्षी शाळेच्या फी वाढीमुळे आर्थिक बोजा वाढत आहे. उच्च शिक्षण शुल्कामुळे आणखी अडचणी निर्माण होत आहेत. महाविद्यालयीन व तंत्रशिक्षणाच्या वाढीव शुल्कामुळे अनेक पालकांना कर्ज काढण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत तुम्हालाही तुमच्या पाल्याला चांगले शिक्षण द्यायचे असेल, तर त्यासाठी वेळेत तयारी करावी लागेल. मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आम्ही तुम्हाला ४ गुंतवणूक योजना सांगत आहोत. तुमच्या गरजेनुसार आणि बचतीनुसार तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता.

बाल युलिपतुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी तुम्ही चाइल्ड युलिपमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेचं वैशिष्ट्ये म्हणजे ती तुम्हाला शिस्तबद्ध गुंतवणूक, उच्च विमा संरक्षण आणि इक्विटी मार्केटचे फायदे देते. मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बालशिक्षण योजनेचा (ULIP) लाभ आहे. याव्यतिरिक्त, पालक किंवा त्याच्या कायदेशीर पालकाच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम मुलाला दिली जाते.

एंडोमेंट योजनाया योजनांतर्गत, विमा रकमेवर बोनसच्या स्वरूपात स्थिर परतावा दिला जातो. या प्रकारची योजना हमखास परतावा तसेच जीवन विमा संरक्षण देते. या योजनांमध्ये मूल १८ वर्षांचे झाल्यानंतर लागू बोनससह विमा रकमेच्या २५% प्रमाणे चार हप्त्यात पेमेंट करतात. एंडोमेंट योजनांप्रमाणे, या योजना सामान्यतः ठराविक कालावधीत नियमित परताव्यासह येतात. १० वर्षांहून अधिक काळ यासारख्या दीर्घ मुदतीसाठी उत्तम पर्याय म्हणून याची शिफारस केली जाते.

सुकन्या समृद्धी योजनातुम्ही तुमच्या १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडू शकता. अवघ्या २५० रुपयांनी मुलीच्या नावाने खाते उघडता येते. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला कर सूट मिळू शकते. सध्या, ही योजना ८.५०% दराने व्याज देत आहे.

SIP द्वारे गुंतवणूकएसआयपीद्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून, तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी मोठी रक्कम सहज जमा करू शकता. मिड कॅप किंवा स्मॉल कॅप निवडून तुम्ही दीर्घकाळात उत्तम परतावा मिळवू शकता.

टॅग्स :गुंतवणूकशिक्षणशेअर बाजारशेअर बाजार