Join us

EPFOच्या व्याजाचे पैसे कधी येणार? जमा संपूर्ण रकमेवर मिळत नाही व्याज; असं का, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 10:24 IST

2022-23 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केलेल्या रकमेवरील व्याज वाढवून 8.15 टक्के केलं आहे.

2022-23 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीमध्ये (PF) जमा केलेल्या रकमेवरील व्याज वाढवून 8.15 टक्के केलं आहे. तेव्हापासून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य त्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याची वाट पाहत आहेत. या संदर्भात एका सदस्यानं ट्वीट करून ईपीएफओला यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. 

2022-23 या आर्थिक वर्षासाठी खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पाइपलाइनमध्ये आहे. ते लवकरच जमा होईल. व्याजाचं नुकसान होणार नाही, असं उत्तर यावर यापूर्वी ईपीएफओकडून देण्यात आलं. ईपीएफओ खात्यातील व्याज केवळ मासिक आधारावर मोजलं जातं. परंतु ते आर्थिक वर्षाच्या अखेरीस सदस्यांच्या खात्यात जमा केलं जातं.

व्याजदर वाढवलेकर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) आर्थिक वर्ष 2022-23 करिता ईपीएफ खात्यांसाठी 8.15 टक्के व्याजदराची घोषणा केली आहे. यापूर्वी हा व्याजदर 8.10 टक्के होता. 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून जारी करण्यात आलेल्या सर्क्युलरनुसार, याच वर्षाच्या मार्च महिन्यात बोर्डानं व्याजदर 8.10 टक्क्यांवरून 8.15 टक्के करण्यात यावा, असा प्रस्ताव दिला होता. यानुसार, सीबीटीच्या शिफारशीनंतर अर्थमंत्रालयाकडून व्याजदर नोटिफाय केला जातो. यानंतर तो ईपीएफओ सदस्यांच्या खात्यांत जमा केला जाऊ शकतो.

कसं मोजतात व्याजईपीएफ खात्यात दर महिन्याचे जमा पैसे म्हणजेच मंथली रनिंग बॅलन्सच्या आधारावर व्याजाची गणना केली जाते. परंतु हे वर्षाच्या अखेरिस जमा केलं जातं. ईपीएफओ नियमांनुसार चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तारखेला हे व्याज जमा केलं जातं. वर्षभरात जर कोणतीही रक्कम काढली गेली असेल तर ती रक्कम वजा करून १२ महिन्यांचं व्याज काढलं जातं. 

संपूर्ण पैशांवर मिळत नाही व्याजसामान्यत: भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा होणाऱ्या संपूर्ण पैशांवर व्याज मिळतं असं खातेधारकांना वाटत असतं. परंतु असं होत नाही. ईपीएफ अकाऊंटमध्ये पेन्शन फंडात जी रक्कम टाकली जाते, त्यावर कोणत्याही प्रकारे व्याज मोजलं जात नाही. दरम्यान, तुम्ही ऑनलाइन, उमंग अॅपद्वारे किंवा एसएमएसद्वारे तुमची पीएफ खात्यातील रक्कम तपासून पाहू शकता.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीपैसा