Stock SIP vs Mutual Fund SIP: गेल्या काही वर्षात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं प्रमाण झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. यातही नियमितपणे छोटी रक्कम गुंतवण्याचा 'सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन' अर्थात एसआयपी हा मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी मार्ग ठरला आहे. पारंपरिकपणे एसआयपीचा संबंध फक्त म्युच्युअल फंडाशी जोडला जात होता, पण आता अनेक ब्रोकिंग कंपन्या थेट शेअर्समध्येही एसआयपी करण्याची सुविधा देत आहेत. गुंतवणूकदार म्हणून तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
म्युच्युअल फंड एसआयपी म्हणजे काय?म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये, तुम्ही एका निश्चित वेळेस ठरवलेली रक्कम एका फंडात गुंतवता. तुमचा पैसा इतर हजारो गुंतवणूकदारांच्या पैशांसोबत जमा केला जातो. हा एकत्रित फंड एक प्रोफेशनल फंड मॅनेजर हाताळतो.फंड मॅनेजर हा पैसा शेअर्स, बाँड्स किंवा इतर गुंतवणूक साधनांमध्ये विभागून लावतो.यामुळे जोखीम कमी होते, कारण एका क्षेत्रातील गुंतवणूक कमी परतावा देत असली, तरी दुसऱ्या क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे त्याची भरपाई होते.तुम्हाला स्वतः शेअर्स निवडण्याची किंवा मार्केट ट्रॅक करण्याची गरज नसते.
स्टॉक एसआयपी म्हणजे काय?
- स्टॉक एसआयपी म्हणजे तुम्ही एखादा किंवा अनेक शेअर्स नियमित अंतराने (उदा. साप्ताहिक किंवा मासिक) एका निश्चित रकमेत खरेदी करता. हा प्रकार थेट शेअर्स खरेदी करण्याचा एक पद्धतशीर मार्ग आहे.
- या पद्धतीमुळे तुम्ही वेगवेगळ्या वेळी शेअर्स खरेदी करता आणि तुमच्या खरेदीची सरासरी किंमत संतुलित राहते. यामुळे 'मार्केट टाइमिंग' करण्याचा ताण कमी होतो.
- ही थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक असल्यामुळे यात म्युच्युअल फंडापेक्षा जोखीम जास्त असते.
म्युच्युअल फंड एसआयपी आणि स्टॉक एसआयपीमधील प्रमुख फरक
वैशिष्ट्य | स्टॉक एसआयपी (थेट शेअर्स) | म्युच्युअल फंड एसआयपी |
गुंतवणुकीचा दृष्टिकोन | एका किंवा काही निवडक शेअर्समध्ये गुंतवणूक | शेअर्स, बाँड्स आणि इतर साधनांमध्ये विविध पोर्टफोलिओ |
गुंतवणूक व्यवस्थापन | गुंतवणूकदाराला स्वतः शेअर्स निवडणे आणि ट्रॅक करणे आवश्यक | प्रोफेशनल फंड मॅनेजरद्वारे व्यवस्थापन |
जोखीम पातळी | जास्त – एका किंवा काही कंपन्यांवर अवलंबून असल्याने | कमी – गुंतवणूक अनेक ठिकाणी विभागलेली असल्याने |
वेळेची गरज | जास्त – कंपनीचे निकाल, मार्केट बातम्या सतत पाहाव्या लागतात | कमी – फंड मॅनेजर हे काम करतो |
गुंतवणुकीची साधने | थेट कंपनीच्या शेअर्समध्ये | शेअर्स, बाँड्स आणि इतर साधनांचे मिश्रण |
स्टॉक एसआयपी करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
- जर तुम्ही स्टॉक एसआयपी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही बाजारातील जाणकार असणे आवश्यक आहे.
- तुम्हाला शेअर बाजार आणि कंपनीची आर्थिक स्थिती (नफा, विक्री, कर्ज) याची चांगली माहिती असावी लागते.
- शेअर्सच्या किमतीत मोठे चढ-उतार होतात. त्यामुळे मोठी जोखीम घेण्याची तुमची तयारी असावी.
- वारंवार शेअर्स खरेदी केल्यास ब्रोकरेज आणि ट्रान्झॅक्शन शुल्क वारंवार लागतात.
- स्टॉक एसआयपीमध्ये एकाच कंपनीत सर्व पैसे न गुंतवता, वेगवेगळ्या कंपन्या निवडून दीर्घकाळ गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.
तुमच्यासाठी कोणता एसआयपी पर्याय सर्वोत्तम?
- हा निर्णय तुमच्या जोखीम घेण्याची क्षमता, बाजार ज्ञान आणि वेळ देण्याची इच्छा यावर अवलंबून आहे.
- तुम्ही नवखे असाल किंवा मार्केटमध्ये जास्त वेळ देऊ शकत नसाल: म्युच्युअल फंड एसआयपी तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. येथे व्यावसायिक व्यवस्थापन आणि विविधीकरण असल्याने जोखीम कमी होते.
- तुम्ही मार्केटचे जाणकार असाल आणि स्वतः रिसर्च करू शकत असाल: स्टॉक एसआयपी तुम्हाला जास्त परतावा मिळवून देऊ शकतो. कारण, तुम्हाला आवडत्या आणि चांगल्या कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक करता येते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Stock SIPs involve direct investment in shares, offering potentially higher returns but with greater risk. Mutual fund SIPs, managed by professionals, diversify investments, reducing risk. Choose based on risk tolerance, market knowledge, and time commitment. Novices may prefer mutual funds for safety.
Web Summary : स्टॉक एसआईपी में सीधे शेयरों में निवेश होता है, जिससे संभावित रूप से अधिक रिटर्न मिलता है लेकिन जोखिम भी अधिक होता है। म्यूचुअल फंड एसआईपी, पेशेवरों द्वारा प्रबंधित, निवेशों में विविधता लाते हैं, जिससे जोखिम कम होता है। जोखिम सहनशीलता, बाजार ज्ञान और समय प्रतिबद्धता के आधार पर चुनें। नौसिखिए सुरक्षा के लिए म्यूचुअल फंड पसंद कर सकते हैं।