Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 14:29 IST

Gold Silver Rate : गेल्या आठवड्यात चांदीच्या किमती प्रति किलो १६,००० रुपयांच्या विक्रमी किमतीपर्यंत वाढल्या आहेत, तर सोन्यातही माफक पण सातत्यपूर्ण वाढ सुरू आहे.

Gold Silver Rate : लग्नसराईच्या काळात मौल्यवान धातूंनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला चटका देण्यास सुरुवात केली आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात संथ पण सातत्यपूर्ण वाढ पाहायला मिळाली असली, तरी चांदीने मात्र सर्वांनाच धक्का दिला आहे. अवघ्या ७ दिवसांत चांदीच्या दरात तब्बल १६,००० रुपयांची ऐतिहासिक झेप पाहायला मिळाली आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे संकेत यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत ही तेजी आल्याचे मानले जात आहे.

सोन्याची संथ वाटचालदेशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत साप्ताहिक स्तरावर किरकोळ वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या दरात २६० रुपयांची, तर २२ कॅरेट सोन्यात २५० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.

  • नवी दिल्ली : २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३४,३३० रुपये (प्रति १० ग्रॅम), तर २२ कॅरेटसाठी १,२३,१५० रुपये मोजावे लागत आहेत.
  • मुंबई व पुणे : मुंबई आणि पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर १,३४,१८० रुपये असून २२ कॅरेटचा भाव १,२३,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.
  • जागतिक बाजार : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव ४,३२२.५१ डॉलर प्रति औंसवर स्थिरावले आहेत.

चांदीची विक्रमी 'सेंचुरी'सोन्याच्या तुलनेत चांदीने या आठवड्यात मोठी चमक दाखवली आहे. केवळ एका आठवड्यात चांदी प्रति किलो १६,००० रुपयांनी महागली असून, २१ डिसेंबर रोजी चांदीचा भाव २,१४,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. चालू वर्षात चांदीने आतापर्यंत १२६ टक्क्यांचा अभूतपूर्व परतावा दिला असून, गुंतवणुकीसाठी चांदी आता पसंतीचा पर्याय ठरत आहे. जागतिक बाजारात चांदी ६५.८५ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

तेजीची प्रमुख कारणे

  1. फेड रिझर्व्हचे संकेत : अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर क्रिस्टोफर वॉलर यांनी व्याजादरात कपातीचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सोन्या-चांदीकडे वळला आहे.
  2. अमेरिकन कामगार बाजार : अमेरिकेतील कामगार बाजाराची आकडेवारी कमकुवत येत असल्याने डॉलरवर दबाव निर्माण झाला आहे, ज्याचा फायदा मौल्यवान धातूंना मिळत आहे.
  3. जागतिक अनिश्चितता : जागतिक स्तरावरील भू-राजकीय तणाव आणि आर्थिक अस्थिरतेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीला मागणी वाढली आहे.

शहरनिहाय दर (२४ कॅरेट - प्रति १० ग्रॅम)

शहर सोन्याचा दर (रुपये) 
मुंबई/पुणे१,३४,१८०
नवी दिल्ली१,३४,३३०
चेन्नई/कोलकाता१,३४,१८०
बेंगळुरू१,३४,१८०
English
हिंदी सारांश
Web Title : Silver Surges ₹16,000 in a Week; Gold's Performance?

Web Summary : Silver prices skyrocketed by ₹16,000 in a week, offering 126% returns this year. Gold saw a modest increase. Global factors and US Federal Reserve hints fueled the precious metals' rally. Silver is now a preferred investment option.
टॅग्स :चांदीसोनंशेअर बाजारगुंतवणूक