Join us

देशात 100 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या 5 पटीने वाढली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 16:22 IST

High Networth Individual: एसबीआयने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

Taxpayers With High Income: गेल्या काही वर्षांमध्ये देशातील श्रीमंतांची संख्या वाढत आहे. SBI ने एक संशोधन अहवाल जारी केला आहे, त्यानुसार देशात 100 कोटींहून अधिक उत्पन्न असलेल्या लोकांची संख्या 5 पटीने वाढली आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात 100 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांची संख्या केवळ 23 होती, जी मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या कार्यकाळात 136 वर पोहोचली आहे.

5 पटीने वाढले कोट्यधीशएसबीआयच्या संशोधन अहवालानुसार, 2013-14 या आर्थिक वर्षात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांची संख्या 23 होती, या 23 लोकांचे एकूण उत्पन्न 29,920 कोटी रुपये होते. त्यानंतर मोदी सरकार सत्तेवर आले आणि मोदी सरकारच्या पहिल्या सात वर्षांच्या कार्यकाळात, म्हणजेच 2020-21 पर्यंत 100 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या 136 झाली आहे. म्हणजेच 7 वर्षांत 100 कोटींहून अधिक कमावणाऱ्यांची संख्या सुमारे 5 पटीने वाढली आहे.

या श्रेणीचा ITR 300 पट वाढला अहवालानुसार, 2013-14 या आर्थिक वर्षात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या या 23 लोकांच्या उत्पन्नाचा वाटा 1.64 टक्के होता. 100 कोटींहून अधिक कमावणाऱ्या लोकांच्या संख्येत पुढील सात वर्षांत 491 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी, 2020-21 या आर्थिक वर्षात सर्व करदात्यांच्या एकूण उत्पन्नातील वाटा 0.77 टक्क्यांवर आला. एसबीआयच्या अहवालानुसार, 5 ते 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळवणाऱ्या करदात्यांच्या संख्येत 295 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच कालावधीत आयटीआर भरणाऱ्या आणि 10 ते 25 लाख रुपये कमावणाऱ्या करदात्यांच्या संख्येत 3 पट वाढ झाली आहे.

टॅग्स :व्यवसायभारतगुंतवणूकपैसा