Indian Post Investment Scheme: जर तुम्ही सुरक्षित आणि नियमित बचतीचा पर्याय शोधत असाल, तर इंडिया पोस्टची पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना तुमच्यासाठी अधिक चांगली ठरू शकते. ही सरकार समर्थित बचत योजना असून, यामध्ये तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम जमा करता आणि त्यावर तुम्हाला ठराविक व्याज मिळतं. या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा असतो, जो पुढे पुन्हा ५ वर्षांसाठी वाढवता येतो. कमी जोखीम आणि स्थिर परताव्यामुळे ही योजना अशा लोकांसाठी लोकप्रिय आहे ज्यांना बाजारातील चढ-उतारांपासून दूर राहायचं आहे.
कसा तयार होईल मोठा निधी?
जर तुम्ही दररोज ५०० रुपये वाचवले, तर ही बचत महिन्याला सुमारे १५,००० रुपयांच्या बरोबर होते. ५ वर्षांच्या कालावधीत तुम्ही एकूण ९ लाख रुपये जमा करू शकता. सध्याच्या वार्षिक ६.७ टक्के व्याजदरानुसार, या रकमेवर चांगला परतावा मिळतो. जर ही गुंतवणूक १० वर्षांपर्यंत सुरू ठेवली, तर जमा केलेली रक्कम आणि व्याज मिळून हा निधी सुमारे २५ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. दीर्घकाळात मिळणाऱ्या 'कंपाउंडिंग'च्या फायद्यामुळे छोटी बचत देखील एका मोठ्या ध्येयात रूपांतरित होते.
चांदी ७ हजारांपेक्षा जास्त तर, सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, पाहा काय आहेत आजचे दर
पोस्ट ऑफिस आरडी योजनेचे मुख्य फायदे
पोस्ट ऑफिस आरडी योजनेचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याला असलेली सरकारी हमी, ज्यामुळे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. या योजनेत किमान १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येतं, म्हणजेच सर्व उत्पन्न गटातील लोक यात सहभागी होऊ शकतात. निश्चित व्याजदरामुळे परताव्याचा अंदाज घेणे आणि भविष्याचे नियोजन करणं सोपं जातं. तसंच, १२ हप्ते जमा केल्यानंतर तुम्ही तुमच्या जमा रकमेवर ५० टक्क्यांपर्यंत कर्ज देखील घेऊ शकता, जे गरजेच्या वेळी उपयुक्त ठरतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यात शेअर बाजारासारखी कोणतीही जोखीम नसते.
मुदतीपूर्वी खाते बंद करण्याचे परिणाम
जर तुम्ही निश्चित कालावधी पूर्ण होण्यापूर्वी आरडी खातं बंद केलं, तर तुम्हाला मिळणारं व्याज हे सामान्य बचत खात्याच्या दरानं मिळतं, जे तुलनेनं कमी असतं. त्यामुळे संपूर्ण मुदतीपर्यंत गुंतवणूक कायम ठेवणं जास्त फायदेशीर ठरतं. ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांना बचतीची शिस्त लावून घ्यायची आहे आणि सुरक्षित मार्गानं दीर्घकालीन मोठा निधी तयार करायचा आहे. नियमित गुंतवणूक आणि संयम राखल्यास ही योजना भविष्यातील आर्थिक सुरक्षा अधिक मजबूत करू शकते.
Web Summary : Indian Post's RD scheme offers a safe, government-backed investment. Saving ₹500 daily can yield ₹25 lakhs in 10 years with compounding benefits. It provides fixed returns, loan options, and security, making it ideal for long-term financial goals.
Web Summary : इंडिया पोस्ट की आरडी योजना सुरक्षित निवेश का विकल्प है। रोजाना ₹500 बचाने पर 10 वर्षों में चक्रवृद्धि ब्याज के साथ ₹25 लाख तक मिल सकते हैं। यह योजना निश्चित रिटर्न, ऋण विकल्प और सुरक्षा प्रदान करती है, जो दीर्घकालिक वित्तीय लक्ष्यों के लिए आदर्श है।