Join us
Daily Top 2Weekly Top 5

दावेदार कोण? 'या' ठिकाणी भारतीयांचे ₹२.२ लाख कोटी पडून; अहवालातून माहिती समोर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 15:06 IST

Unclaimed Assets: या रकमेवर दीर्घकाळापासून कोणीही दावा केलेला नाही.

Unclaimed Assets: भारतात दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, अनेकदा योग्य कागदपत्रे किंवा नॉमिनी अपडेट न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसे आणि मालमत्ता ‘लावारिस’ अवस्थेत अडकून पडते. एका अभ्यासानुसार, देशात सुमारे २.२ लाख कोटी रुपयांची दावा न केलेली मालमत्ता अशीच पडून आहे.

शेअर्समध्येच ८९,००० कोटी अडकले

अहवालानुसार, डिसेंबर २०२५ पर्यंत १६७१ लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुमारे ८९,००० कोटी रुपये अडकलेले आहेत. ही रक्कम दीर्घकाळापासून कोणीही क्लेम केलेली नाही.

विविध क्षेत्रांमध्ये अडकलेली रक्कम

ही ‘अनक्लेम्ड’ मालमत्ता केवळ शेअर मार्केटपुरती मर्यादित नसून अनेक आर्थिक क्षेत्रांमध्ये पसरलेली आहे.

  • बँक डिपॉझिट: ९७,५४५ कोटी रुपये
  • इक्विटी शेअर्स: ८९,००४ कोटी रुपये
  • विमा (इन्शुरन्स): २०,०६२ कोटी रुपये
  • EPF (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी): १०,९१५ कोटी रुपये
  • म्युच्युअल फंड: ३,४५२ कोटी रुपये

बँकांमधील ही अनक्लेम्ड रक्कम Reserve Bank of India च्या DEA (Depositor Education and Awareness) Fund मध्ये जमा केली जाते, जिथे या रकमेवर केवळ सुमारे ३% साधे व्याज मिळते.

महागाईमुळे मूल्य घटतेय

ही मोठी रक्कम वर्षानुवर्षे पडून असल्यामुळे महागाईचा परिणाम होऊन तिचे वास्तविक मूल्य कमी होत आहे. म्हणजेच, केवळ पैसा अडकून नाही तर त्याची खरेदी क्षमता देखील घटत चालली आहे.

‘लावारिस’ पैशामागची कारणे

तज्ज्ञांच्या मते, खालील प्रमुख कारणांमुळे ही परिस्थिती निर्माण होते:

गुंतवणुकीवेळी नॉमिनी नोंद न करणे किंवा अपडेट न करणेकुटुंबीयांना गुंतवणुकीची माहिती न देणेक्लेम प्रक्रिया कशी करायची याची माहिती नसणेअनेक वर्षे निष्क्रिय राहिलेले खाते (EPFमध्ये सुमारे ३८% खाते निष्क्रिय)

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा सल्ला

प्रत्येक गुंतवणुकीसाठी नॉमिनी नोंद करणे आणि वेळोवेळी अपडेट करणेकुटुंबीयांना आपल्या गुंतवणुकीची संपूर्ण माहिती देणेसंबंधित खात्यांची नियमित तपासणी करणेक्लेम प्रक्रियेबाबत जागरूक राहणे

English
हिंदी सारांश
Web Title : ₹2.2 Lakh Crore Unclaimed Indian Assets: Who Are the Claimants?

Web Summary : ₹2.2 lakh crore in Indian assets remain unclaimed due to missing nominees and lack of awareness. This includes ₹89,000 crore in shares, ₹97,545 crore in bank deposits, and ₹20,062 crore in insurance. Experts advise nominating beneficiaries, informing family, and regular account checks to avoid this.
टॅग्स :गुंतवणूकम्युच्युअल फंडभविष्य निर्वाह निधीबँकिंग क्षेत्रशेअर बाजार