Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांनो सावधान! जगातील सर्वात मोठा 'मार्केट क्रॅश' जवळ? कियोसाकींनी सांगितले श्रीमंत होण्याचे सूत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:50 IST

Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांनी सोने, चांदी आणि क्रिप्टोकरन्सींबाबत एक भाकीत वर्तवले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, एक आर्थिक बुडबुडा फुटण्याच्या बेतात आहे, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ होईल.

Financial Bubble : मध्यपूर्वेतील संधर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. यात भारतीय शेअर बाजारही होरपळून निघाला आहे. अशा परिस्थितीत 'रिच डॅड, पुअर डॅड' या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी जागतिक अर्थव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा एक खळबळजनक भाकीत केले आहे. जग सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक बुडबुड्याच्या उंबरठ्यावर उभे असून, हा फुगा कधीही फुटू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र, ही पडझड गुंतवणूकदारांना 'अब्जाधीश' होण्याची संधी देईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

..आणि बाजाराचा खेळ खल्लास!कियोसाकी यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "कोणती तरी एक 'पिन' या अवाढव्य फुग्याला छिद्र पाडेल आणि बाजार कोसळेल." हा क्रॅश कधी होईल याची नेमकी तारीख त्यांनी सांगितली नसली, तरी तो काळ आता फार लांब नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोणताही मोठा जागतिक इव्हेंट किंवा ट्रिगर या महाभयंकर पडझडीला कारणीभूत ठरेल, असे त्यांचे मत आहे.

सोनं-चांदीचे दर गगनाला भिडणार?कियोसाकी यांच्या मते, हा आर्थिक फुगा फुटल्यानंतर वर्षभरातच मौल्यवान धातूंच्या किमतीत अकल्पनीय वाढ होईल.सध्या सोन्याचा भाव ५,००० डॉलर्स प्रति औंसच्या आसपास आहे. कियोसाकींच्या मते, वर्षभरात हे दर ३५,००० डॉलर्सवर पोहोचतील. म्हणजेच सोन्याच्या किमतीत ७ पट वाढ अपेक्षित आहे.सध्या चांदी ८२ डॉलर्स प्रति औंसवर आहे. आर्थिक संकटानंतर ती २०० डॉलर्सवर जाईल, असा त्यांचा दावा आहे.

क्रिप्टोकरन्सीमध्ये येणार 'त्सुनामी'केवळ सोने-चांदीच नाही, तर डिजिटल चलनाबाबतही त्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

  • बिटकॉइन : सध्या ७४,००० डॉलर्सवर असलेला एक बिटकॉइन वर्षभरात ७.५० लाख डॉलर्सवर जाईल. म्हणजेच किमतीत १० पटीने वाढ होईल.
  • इथेरियम : सध्या २,३०० डॉलर्सवर असलेल्या इथेरियमची किंमत थेट ९५,००० डॉलर्सवर पोहोचेल. हा आकडा सध्याच्या किमतीपेक्षा ४० पटीने जास्त आहे.

श्रीमंत होण्याची संधी की निव्वळ अफवा?रॉबर्ट कियोसाकी हे गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारच्या भविष्यवाण्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या अनेक गोष्टी भूतकाळात खऱ्या ठरल्या आहेत, तर काही सपशेल चुकीच्याही ठरल्या आहेत. "येणारे संकट गुंतवणूकदारांना श्रीमंत होण्याची संधी देईल का?" असा सवाल त्यांनी स्वतःच उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, जे लोक योग्य वेळी सोने, चांदी आणि क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करतील, ते या गोंधळातून मोठा नफा कमावू शकतील.

वाचा - टाटा पॉवर ते SBI पर्यंत, 'या' ५ शेअर्समध्ये दडलाय मोठा परतावा, ब्रोकरने दिली टार्गेट प्राईस

डिस्लेमर : गुंतवणूकदारांनी अशा भविष्यवाण्यांकडे गांभीर्याने पाहतानाच, स्वतःच्या अभ्यासावर आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. बाजार कोसळण्याची भीती असली तरी, किमती इतक्या पटीने वाढणे हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Market crash imminent? Kiyosaki's formula for wealth revealed, investors beware!

Web Summary : Robert Kiyosaki warns of a massive financial bubble burst, potentially triggering a market crash. He predicts soaring gold, silver, and cryptocurrency prices, offering a wealth-building opportunity for savvy investors. However, caution and expert advice are crucial.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूकशेअर बाजारअमेरिका-इस्रायल-इराण वॉर