Join us

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 16:25 IST

Post Office Scheme: जर तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील आणि चांगले उत्पन्न मिळवायचे असेल, तर पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते.

Post Office Scheme : गेल्या वर्षभरापासून शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार पुन्हा एकदा पारंपरिक पर्यांकडे वळत आहेत. जर तुम्हाला तुमच्या कष्टाच्या पैशांवर कोणतीही जोखीम न घेता चांगला परतावा मिळवायचा असेल, तर पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट स्कीम तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. या सरकारी योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे, तुम्ही फक्त ५ वर्षांत व्याजाच्या माध्यमातूनच तब्बल ४.५ लाख रुपयांची कमाई करू शकता.

कशी काम करते ही योजना?पोस्ट ऑफिसच्या या टाइम डिपॉझिट स्कीममध्ये तुम्हाला फक्त एकदाच पैसे गुंतवायचे असतात. यानंतर, तुमच्या गुंतवणुकीवर दरवर्षी चक्रवाढ व्याज जमा होत राहते, ज्यामुळे तुमचे पैसे वेगाने वाढतात. या योजनेत ५ वर्षांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक ७.५% व्याज मिळते, जे सध्याच्या काळात सरकारी योजनेत मिळणाऱ्या परताव्याच्या तुलनेत खूपच चांगले आहे.

या योजनेतील गुंतवणुकीचे गणित सोपे आहे. जर तुम्ही या स्कीममध्ये १० लाख रुपये गुंतवले, तर ५ वर्षांच्या मुदतीनंतर तुमच्या गुंतवणुकीची एकूण रक्कम सुमारे १४.५ लाख रुपये होईल. म्हणजेच, कोणतीही जोखीम न घेता तुम्हाला केवळ व्याजातूनच ४.५ लाख रुपयांचा निव्वळ फायदा मिळेल.

गुंतवणुकीनुसार असा मिळेल परतावातुमच्या सोयीनुसार, तुम्ही या स्कीममध्ये कमी किंवा जास्त रक्कम गुंतवू शकता. तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेनुसार मिळणाऱ्या व्याजाची रक्कमही बदलेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या गुंतवणूकदाराने ५ वर्षांसाठी ५ लाख रुपये गुंतवले, तर त्याला ₹२,२४,९७४ रुपयांचा व्याज मिळेल आणि एकूण मॅच्युरिटी रक्कम ७,२४,९७४ रुपये होईल. 

योजनेचे इतर फायदे

  • कर सवलत: या स्कीममध्ये तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ घेऊ शकता.
  • कर्ज सुविधा: गरज पडल्यास, तुम्ही तुमच्या जमा केलेल्या रकमेवर कर्जही घेऊ शकता. यामुळे, तुमचे पैसे केवळ वाढणार नाहीत, तर अडचणीच्या वेळी मदतीलाही येतील.
  • खाते उघडण्याची सोय: हे खाते तुम्ही एकटे किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत जॉईंट अकाउंटमध्येही उघडू शकता. याशिवाय, १० वर्षांवरील मुलांचे खाते त्यांच्या पालकांद्वारे उघडता येते.

वाचा - GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन

एकंदरीत, पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट स्कीम कमी जोखीम असलेल्या गुंतवणुकीसाठी एक चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूकपैसाकर