Post Office Time Deposit : वाढती महागाई आणि बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात केलेली कपात, यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार सध्या चिंतेत आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्याचा परिणाम बँकांच्या परताव्यावर झाला असतानाच, पोस्ट ऑफिसची 'टाईम डिपॉझिट' योजना गुंतवणूकदारांसाठी मोठा आधार ठरत आहे. या योजनेत केवळ उच्च परतावाच मिळत नाही, तर केंद्र सरकारची थेट गॅरंटी असल्याने पैसाही पूर्णपणे सुरक्षित आहे.
बँकेसारखीच सुविधा, पण परतावा जास्त!पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवीला 'टाईम डिपॉझिट' असे म्हटले जाते. यात १, २, ३ आणि ५ वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये मिळणारे व्याजदर कोणत्याही मोठ्या बँकेच्या तुलनेत अधिक आकर्षक आहेत.
- १ वर्षाची टीडी : ६.९ टक्के व्याज.
- २ वर्षांची टीडी : ७.० टक्के व्याज.
- ३ वर्षांची टीडी : ७.१ टक्के व्याज.
- ५ वर्षांची टीडी : ७.५ टक्के व्याज.
१ लाखाचे होतील १.४५ लाख!जर तुम्ही ५ वर्षांच्या टीडी योजनेत १,००,००० रुपये गुंतवले, तर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला एकूण १,४४,९९५ रुपये मिळतील. म्हणजेच, ५ वर्षांत तुम्हाला ४४,९९५ रुपयांचे निश्चित व्याज मिळेल. सध्या देशातील कोणतीही मोठी बँक ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्क्यांपर्यंत व्याज देत नसल्याने पोस्टाची ही योजना गुंतवणुकीसाठी 'हॉट केक' ठरत आहे.
वाचा - अर्थसंकल्पात सोने-चांदी स्वस्त होणार? आयात शुल्क आणि GST कपातीसाठी सरकारवर दबाव
योजनेची वैशिष्ट्ये
- सर्वांसाठी समान व्याज : बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज दिले जाते, मात्र पोस्टाच्या टीडीमध्ये सर्व वयोगटातील गुंतवणूकदारांना समान व्याजदर मिळतो.
- सरकारी नियंत्रण : या योजनांवरील व्याजदरांचे नियंत्रण थेट वित्त मंत्रालयाकडे असते आणि दर तीन महिन्यांनी त्याचा आढावा घेतला जातो.
- सुरक्षितता : ही योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जात असल्याने गुंतवणुकीवर १००% सुरक्षिततेची हमी मिळते.
Web Summary : Post Office Time Deposit offers attractive interest rates, surpassing banks. A ₹1 lakh investment yields ₹1.45 lakh in five years. Equal rates for all ages and government guarantee ensure safety, making it a hot investment option.
Web Summary : पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट बैंकों से बेहतर ब्याज दर प्रदान करता है। ₹1 लाख का निवेश पांच साल में ₹1.45 लाख देगा। सभी उम्र के लिए समान दरें और सरकारी गारंटी निवेश को सुरक्षित बनाती हैं, जो इसे एक आकर्षक विकल्प बनाती है।