Join us

लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:19 IST

Post Office : या सरकारी योजनेचा जास्तीत जास्त फायदा लग्नानंतर मिळू शकतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संयुक्त खाते उघडले तर तुम्ही स्वतःसाठी दरमहा १०,००० रुपयांचे उत्पन्न मिळवू शकता.

Scheme for Monthly Income : लग्नानंतर आर्थिक नियोजन करणे हे प्रत्येक जोडप्यासाठी महत्त्वाचे असते. आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि दरमहा नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी अनेकदा योग्य योजनेच्या शोधात असतो. तुमच्यासाठी अशीच एक उत्तम सरकारी योजना आहे, ज्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्ही लग्नानंतर घेऊ शकता. या योजनेत, जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संयुक्त खाते उघडले, तर तुम्ही स्वतःसाठी दरमहा १०,००० रुपयांपर्यंतचे निश्चित उत्पन्न मिळवू शकता! आम्ही बोलत आहोत पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेबद्दल. ही योजना खास अशा लोकांसाठी तयार केली आहे, ज्यांना दरमहा निश्चित उत्पन्न हवे आहे. यात तुम्ही एकट्याने किंवा जोडीदारासोबत खाते उघडू शकता.

कशी काम करते ही योजना?पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) ही एक सुरक्षित आणि निश्चित उत्पन्न देणारी सरकारी योजना आहे.

  • सध्याचा व्याजदर: या योजनेवरील सध्याचा व्याजदर वार्षिक ७.४% आहे.
  • गुंतवणुकीची मर्यादा: आता एकाच खात्यातून जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा करता येतात. पण, जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संयुक्त खाते उघडले, तर तुम्ही जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा करू शकता.
  • किमान गुंतवणूक: हे खाते उघडण्यासाठी किमान १,००० रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे, त्यानंतर तुम्ही १,००० च्या पटीत ठेवी करू शकता.
  • व्याज वितरण: तुम्ही जमा केलेल्या रकमेवरील वार्षिक व्याज १२ भागांमध्ये विभागले जाते आणि ते दरमहा तुमच्या खात्यात जमा होते.
  • मुदतपूर्ती: या योजनेचा मुदतपूर्ती कालावधी ५ वर्षे आहे. ५ वर्षांनंतर तुम्ही नवीन व्याजदरानुसार हे खाते पुढे वाढवू शकता.

मासिक उत्पन्न किती मिळेल?या योजनेतून तुम्हाला किती मासिक उत्पन्न मिळू शकते?संयुक्त खाते (जास्तीत जास्त गुंतवणूक १५ लाख रुपये):वार्षिक व्याजदर: ७.४%वार्षिक व्याज: १,११,००० रुपयेमासिक व्याज: ९,२५० रुपये

एकल खाते (जास्तीत जास्त गुंतवणूक ९ लाख रुपये)वार्षिक व्याजदर: ७.४%वार्षिक व्याज: ६६,६०० रुपयेमासिक व्याज: ५,५५० रुपये

तुम्ही मासिक रक्कम काढली नाही, तर ती तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात राहील आणि मुदतपूर्तीनंतर मूळ रकमेसह जमा होईल. यामुळे तुम्हाला अतिरिक्त फायदा मिळू शकतो.

खाते कोण उघडू शकते?

  • पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये खालील व्यक्ती खाते उघडू शकतात.
  • कोणताही प्रौढ व्यक्ती स्वतःच्या नावाने एकल खाते उघडू शकतो.
  • जास्तीत जास्त ३ प्रौढ व्यक्ती एकत्र येऊन संयुक्त खाते उघडू शकतात (याला संयुक्त अ किंवा संयुक्त ब असे म्हणतात).
  • पालक आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने खाते उघडू शकतात.
  • जर अल्पवयीन व्यक्ती १० वर्षांचा असेल, तर तो स्वतःच्या नावाने खाते उघडू शकतो.

वाचा - रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! पुढच्या महिन्यापासून तिकिटाचे दर वाढणार; तत्काळ बुकिंगसाठीही महत्त्वाचा बदल!

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही निवृत्त झालेले लोक, गृहिणी किंवा ज्यांना दरमहा निश्चित आणि सुरक्षित उत्पन्न हवे आहे, अशा लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. सरकारी योजना असल्यामुळे यात तुमच्या गुंतवणुकीला सुरक्षिततेची हमी मिळते. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधू शकता.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूकपैसा