Platinum Price Surge : सध्या देशभरात सणासुदीची धामधूम सुरू असून सगळीकडे बाजारपेठा ग्राहकांनी भरल्या आहेत. दुसरीकडे सोने आणि चांदीच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने सामान्य ग्राहक चिंतेत आहेत. मात्र, याच दरम्यान सोने-चांदीला टक्कर देण्यासाठी प्लॅटिनम या मौल्यवान धातूने बाजारात जोरदार पुनरागमन केले आहे. यंदा या धातूच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, भविष्यातही याचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे.
प्लॅटिनमच्या किमतीत ७० टक्क्यांची उसळीया वर्षभरात प्लॅटिनमच्या किमतीत जवळपास ७० टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. या तुलनेत सोन्याच्या दरात ५१ टक्के, तर चांदीच्या दरात ५८ टक्के वाढ झाली आहे. प्लॅटिनमने सोन्या-चांदीपेक्षा जास्त वाढ नोंदवली असली, तरी तो अजूनही मे २००८ मधील त्याच्या उच्चांकी दरापेक्षा (प्रति औंस २,२५० डॉलर्स) २८ टक्के खाली आहे. विशेष म्हणजे, २०२३ आणि २०२४ मध्ये याच्या किमतीत ८ टक्क्यांची घसरण झाली होती.
पुरवठ्यातील घट आणि वाढत्या मागणीमुळे दरवाढ
- प्लॅटिनमच्या किमतीतील या मोठ्या वाढीमागे पुरवठ्यातील मोठी घट आणि मागणीत झालेली वाढ ही मुख्य कारणे आहेत.
- औद्योगिक वापर: दागिने बनवण्यासोबतच प्लॅटिनमचा वापर ऑटो सेक्टर, पेट्रोकेमिकल इंडस्ट्री आणि हायड्रोजन ऊर्जा यांसारख्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.
- वाहनांमध्ये कॅटेलिटिक कन्व्हर्टर्स बनवण्यासाठी प्लॅटिनमचा ७० टक्क्यांहून अधिक वापर होतो. हरित तंत्रज्ञानामुळे प्लॅटिनमची मागणी भविष्यातही वाढत राहणार आहे.
- पाइनट्री मॅक्रोचे संस्थापक रितेश जैन यांच्या मते, "काही वर्षांपूर्वी प्लॅटिनम सोन्यापेक्षाही महाग होता. आता सोने प्लॅटिनमपेक्षा सुमारे तिप्पट महाग आहे. दागिने खरेदी करणारे ग्राहक सोन्याऐवजी प्लॅटिनमचा वापर करत आहेत."
२०२५ मध्ये विक्रमी तुटवड्याचा अंदाजवर्ल्ड प्लॅटिनम इन्व्हेस्टमेंट कौन्सिलच्या अंदाजानुसार, प्लॅटिनमचा बाजार सतत तुटीत आहे.२०२५ मध्ये या धातूचा ८,५०,००० औंसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. पुरवठ्यातील घट होण्याचे हे सलग तिसरे वर्ष असेल, ज्यामुळे बाजारात तणाव आहे.चॉईस ब्रोकिंगच्या कमोडिटी रिसर्च ॲनालिस्ट कविता मोरे यांच्या माहितीनुसार, २०२५ आणि त्यानंतरही प्लॅटिनमची मागणी मजबूत राहील.
वाचा - फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
जगात सर्वाधिक प्लॅटिनमचे उत्पादन दक्षिण आफ्रिकेच्या खाणींमध्ये होते, परंतु खराब हवामान, तांत्रिक समस्या आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे येथील उत्पादनात मोठी घट झाली आहे, ज्यामुळे जागतिक बाजारात प्लॅटिनमचे दर वाढत राहतील.
Web Summary : Platinum prices surge 70%, surpassing gold and silver returns. Supply shortages and industrial demand, especially in catalytic converters, drive the rally. Analysts predict continued deficits, making platinum a compelling investment alternative.
Web Summary : प्लेटिनम की कीमतों में 70% की वृद्धि, सोना और चांदी से बेहतर प्रदर्शन। आपूर्ति की कमी और औद्योगिक मांग, विशेष रूप से उत्प्रेरक कन्वर्टर्स में, वृद्धि को बढ़ावा देती है। विश्लेषकों ने लगातार घाटे का अनुमान लगाया है।