Join us

२१ व्या वर्षी मुलाला असे बनवा करोडपती; जाणून घ्या फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 13:06 IST

नेमकी कुठे गुंतवणूक करावी, त्याचा फॉर्म्युला काय हे जाणून घेऊ...

आपल्या मुलाला भविष्य घडविण्यासाठी काही अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक आईवडील आपल्या कमाईतून थोडे पैसे बाजूला काढून ठेवत असतात. विचार करा जर तुमचा मुलगा नोकरी करायच्या अगोदरच त्याच्या खात्यावर १ कोटी रुपये असतील तर त्याला किती दिलासा मिळेल ना? मात्र इतके पैसे निर्माण करण्यासाठी नेमकी कुठे गुंतवणूक करावी, त्याचा फॉर्म्युला काय हे जाणून घेऊ...

काय आहेत पर्याय?

आजच्या काळात, तुमच्या मुलाला २१व्या वयातच करोडपती करण्यासाठी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मुलांसाठी मोठा निधी जमा करण्यासाठी तुम्ही ‘एसआयपी’चा योजनेचा पर्याय निवडू शकता. दरमहा केवळ १०,००० रुपयांची बचत करून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उभी हाेऊ शकते.

नेमका पैसा कसा वाढत जातो?

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असाल तर तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितके तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अनेक एसआयपींचा परतावा दीर्घ कालावधीसाठी २० टक्क्यांपर्यंत आहे, तर सरासरी १२ ते १६ टक्क्यांपर्यंत परतावा मिळताे. यामुळे मोठा निधी जमा होतो.

करोडपती करण्याचा फॉर्म्युला

मुलाचा जन्म होताच, आपण प्रत्येक महिन्याला किमान १० हजार रुपयांची एसआयपी २१ वर्षांसाठी सुरू करावी. ही रक्कम तुम्हाला अधिक वाटेल मात्र महागाईचा विचार करता तुम्हाला नंतर ही रक्कम तुम्हाला कमी वाटेल. २१ वर्षांनंतर गुंतवलेली रक्कम २५ लाख २० हजार रुपये होईल. जर यावर २० नव्हे आपण किमान १६ टक्के रिटर्न मिळाले असे पकडले तरीही यातून आपल्याला १ कोटी ८१ लाख १९ हजार ३४५ हजार रुपये मिळतील. त्यामुळे २१ वर्षांनंतर एकूण २,०६,३९,३४५ रुपये मिळतील. यात १२ टक्के रिटर्न मिळाले तरी तुम्ही मुलाच्या खात्यावर १,१३,८६,७४२ रुपये जमा कराल. तुम्ही गुंतवणुकीसाठी चाइल्ड फंडचाही विचार करू शकता.

टॅग्स :व्यवसायनिधीपैसा