Join us

पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 11:22 IST

Investment Tips: पैसे गुंतवण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना आणि पर्याय उपलब्ध आहेत. ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुमचे गुंतवलेले पैसे दुप्पट होतात आणि ते सुरक्षितही राहतात.

Investment Tips: पैसे गुंतवण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना आणि पर्याय उपलब्ध आहेत. काही लोक एफडीसारख्या योजनांमध्ये आपले पैसे गुंतवतात, तर काही लोक जोखीम पत्करून पोस्ट ऑफिसच्या योजनेत आपले पैसे गुंतवतात. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसकडून अनेक प्रकारच्या सरकारी योजनाही चालवल्या जात आहेत, ज्यामध्ये लोक सुरक्षितपणे गुंतवणूक करून खूप चांगला नफा कमावू शकतात. पोस्ट ऑफिसची ही योजना सरकारद्वारे चालवली जाते. अशा परिस्थितीत यात गुंतवलेले पैसे सुरक्षित आहेत.

आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करून तुमचे पैसे दुप्पट करू शकता. मात्र, त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. किसान विकास पत्र ही एक सरकारी योजना आहे, जी ११५ महिन्यांत गुंतवलेली रक्कम दुप्पट करते. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'

किसान विकास पत्र योजना

किसान विकास पत्रात गुंतवणूक करून लोक आपले पैसे दुप्पट करू शकतात. या योजनेत तुम्ही फक्त १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. या योजनेवर वार्षिक ७.५ टक्के व्याज मिळतं. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड ११५ महिन्यांचा आहे. मॅच्युरिटीवर गुंतवलेली रक्कम दुप्पट होते.

कसं कराल अप्लाय?

किसान विकास पत्र योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिसच्या जवळच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला ओळखीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, व्होटर आयडी, पासपोर्ट अशा कागदपत्रांची गरज भासणार आहे. यासोबतच अॅड्रेस प्रूफ आणि पासपोर्ट साइज फोटोही आवश्यक असणार आहे.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूकपैसा