Join us

IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:00 IST

IPO Investment Huge Loss: गेल्या काही वर्षांत आयपीओ बाजारात ज्या प्रकारचा उत्साह दिसून आला आहे तो भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात यापूर्वी कधीही दिसला नव्हता. २०२१ ते २०२४ दरम्यान, गुंतवणूकदारांनी आयपीओकडे फक्त नफ्याचा 'शॉर्टकट' म्हणून पाहण्यास सुरुवात केली.

IPO Investment Huge Loss: गेल्या काही वर्षांत आयपीओ बाजारात ज्या प्रकारचा उत्साह दिसून आला आहे तो भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात यापूर्वी कधीही दिसला नव्हता. २०२१ ते २०२४ दरम्यान, गुंतवणूकदारांनी आयपीओकडे फक्त नफ्याचा 'शॉर्टकट' म्हणून पाहण्यास सुरुवात केली. पण आज त्याच आयपीओमुळे गुंतवणूकदारांचं मोठे नुकसान होताना दिसतंय. या काळात सुमारे २८० कंपन्यांनी आयपीओ लाँच केले, त्यापैकी अनेकांना प्रचंड सबस्क्रिप्शन मिळालं. परंतु आजपर्यंत, डझनभर कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या इश्यू प्राईजपेक्षा ५०% पेक्षा जास्त घसरले आहेत. यापैकी काहींमध्ये गुंतवणूक केल्यानंतर ₹१ लाखांच्या रक्कमेचं मूल्य ₹३,२०० पर्यंत कमी झाली असतं म्हणजेच ९७% तोटा झाला असता.

AGS Transact Technologies मध्ये सर्वाधिक नुकसान

या तोट्याचं सर्वात मोठे उदाहरण म्हणजे AGS ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीज, ज्यानं जानेवारी २०२२ मध्ये प्रति शेअर ₹१७५ या दरानं आपला IPO लाँच केला. त्यावेळी, या आयपीओला ७.८ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं, म्हणजेच गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला होता. पण आज हा स्टॉक ₹ ६ च्या खाली व्यवहार करत आहे. जर एखाद्या गुंतवणूकदारानं या IPO मध्ये ₹१ लाख गुंतवले असते तर आज त्याचं मूल्य फक्त ₹ ३,२०० झालं असतं. भारतीय आयपीओ इतिहासातील सर्वात मोठ्या तोट्यातील लिस्टिंगपैकी हा स्टॉक धरला जाऊ शकतो.

FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट

मोठी आहे यादी

एजीएस हे एकमेव उदाहरण नाही. अलीकडेच आयपीओ आलेल्या पॉप्युलर व्हेइकल्स अँड सर्व्हिसेसचा शेअरही ₹२९५ च्या इश्यू प्राईजपेक्षा ५५% नं कमी झाला आहे. त्याच वेळी, मोठ्या नावांबद्दल बोलायचं झाले तर, पेटीएम (वन ९७ कम्युनिकेशन्स), स्टार हेल्थ, ड्रीमफोक्स सर्व्हिसेस सारख्या कंपन्यांनीही गुंतवणूकदारांना मोठ्या तोट्यात आणलंय. या कंपन्या एकेकाळी चर्चेचे केंद्र होत्या.

या आयपीओमध्ये एक सामान्य पॅटर्न दिसून येतो. इश्यूच्या वेळी कंपनीच्या आर्थिक बाबींना जास्त महत्त्व देण्यात आलं होते. कंपन्यांकडे एक ठोस व्यवसाय मॉडेल नव्हतं, परंतु मार्केटिंग इतकं आकर्षक होते की गुंतवणूकदार त्यात अडकले. पेटीएम हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, जिथे शेअरची किंमत सुरुवातीला ₹२,१५० होती, परंतु आज ती ₹१,०४८ च्या आसपास आहे. ड्रीमफोक्सनं 'एअरपोर्ट लाउंज अॅक्सेस' सारख्या आकर्षक व्यवसाय कल्पनांनी सर्वांना आकर्षित केले, परंतु स्केलेबिलिटी आणि नफ्याचा कोणताही स्पष्ट मार्ग नव्हता.

नुकसान झालं, आता काय करावं?

जर तुम्ही अशा आयपीओमध्ये गुंतवणूक केली असेल ज्याचा तोटा तुम्हाला सहन करावा लागत असेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही, परंतु डोळे बंद करून बसणं देखील हानिकारक असू शकते. SAMCO सिक्युरिटीजचे रिसर्च हेड अपूर्व शेठ म्हणतात की, जर कंपनीचे व्यवसाय मॉडेल मजबूत असेल आणि दीर्घकालीन सुधारणा होण्याची शक्यता असेल, तर स्टॉक होल्ड करणं चांगलं. दुसरीकडे, जर कोणताही स्पष्ट मार्ग नसेल, तर तोटा स्वीकारणं, स्टॉकमधून बाहेर पडणं आणि पैसे इतरत्र गुंतवणं अधिक शहाणपणाचे ठरेल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तोट्यात विकलेले शेअर्स तुम्ही भांडवली तोटा म्हणून दाखवू शकता, ज्यामुळे तुम्हाला कर बचत होण्यास मदत होऊ शकते, असंही ते म्हणाले.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसाइनिशिअल पब्लिक ऑफरिंग