Investment Scheme : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो, अशी म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. आजच्या काळात महिला पाठीमागे नाही तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय. तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी पती-पत्नीने सोबत चालणे फार आवश्यक आहे. आज आपण अशाच एका सरकारी गुंतवणूक योजनेविषयी जाणून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही तुमच्या पत्नीसोबत गुंतवणूक केली तर तुम्हाला महिन्याला जवळपास १० हजार रुपयांचं व्याज मिळेल.
देशातील सर्वसामान्य जनतेला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकार अनेक प्रकारच्या बचत आणि गुंतवणूक योजना राबवत आहे. यामध्ये आपण पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीमविषयी बोलत आहोत. या योजनेवर सध्या ७.४ टक्के दरमहा व्याज दिले जाते. या योजनेत तुम्ही किमान १००० रुपयांनी खाते उघडू शकता. पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेअंतर्गत एका खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा करता येतात. तर संयुक्त खात्यात जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा करण्याची मर्यादा आहे.
पत्नीसोबत खाते उघडल्यास मिळेल पूर्ण फायदेजर तुम्हाला या योजनेचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत पोस्ट ऑफिसमध्ये एमआयएसचे संयुक्त खाते उघडायला लागेल. तुमच्या पत्नीसोबत संयुक्त खाते उघडून तुम्ही त्यात १५ लाख रुपये जमा करू शकता. या गुंतवणुकीवर तुम्हाला दरमहा ९२५० रुपये निश्चित आणि हमीपूर्ण व्याज मिळेल. संयुक्त खात्यात जास्तीत जास्त ३ प्रौढांची नावे जोडली जाऊ शकतात. याशिवाय तुम्ही या योजनेत तुमच्या मुलाच्या नावाने खातेही उघडू शकता.
पोस्ट ऑफिसची मंथली इनकम योजना ५ वर्षात परिपक्वपोस्ट ऑफिसची MIS योजना ५ वर्षात परिपक्व होते. खाते बंद करण्यासाठी, तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल आणि पासबुकसह तुमच्या शाखेत जमा करावा लागेल. त्यानंतर सर्व पैसे तुमच्या पोस्ट ऑफिस खात्यात ट्रान्सफर केले जातात. खाते उघडल्यापासून १ वर्षाच्या आत तुम्हाला कोणतेही पैसे काढता येत नाही. १ वर्षानंतर आणि ३ वर्षापूर्वी पैसे काढल्यास, मूळ रकमेतून २ टक्के वजा केले जातात.