Join us

धनत्रयोदशीला घेतलेले सोने किती रिटर्न देणार? ५ वर्षांत मोठा परतावा, तुम्ही किती घेतले सोने?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 08:07 IST

Dhanteras 2025 Gold Returns News: धनोत्रयोदशीला सोनेखरेदीचा जोरदार ट्रेंड असतो. जागतिक अनिश्चितता आणि देशांतर्गत प्रबळ मागणीमुळे ही वाढ झाली आहे. 

Dhanteras 2025 Gold Returns News: सोन्याने या सणासुदीच्या हंगामात विक्रमी धाव घेतली असून गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. जागतिक अनिश्चितता आणि देशांतर्गत प्रबळ मागणीमुळे ही वाढ झाली आहे. 

गेल्या धनत्रयोदशीपासून सोन्याने तब्बल ५५ टक्के परतावा दिला आहे. हा परतावा निफ्टी ५० सारख्या प्रमुख इक्विटी निर्देशांकांपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. निफ्टी ५० ने याच काळात केवळ ३.५ टक्के परतावा दिला आहे.

धनोत्रयोदशीला सोनेखरेदीचा जोरदार ट्रेंड असतो. त्याची किंमत पुढच्या धनत्रयोदशीपर्यंत कशी वाढत जाते, याची ही आकडेवारी पाहिली तर आतापर्यंतच्या सर्व प्रकारच्या गुंतवणुकीला सोन्याने मागे सोडले असल्याचे दिसून येते.

दिवाळी ते दिवाळी सोन्याने ५ वर्षांत कसे दिले रिटर्न? 

२०२०-२१ -५%२०२१-२२ - १०%२०२२-२३ - २०%२०२३-२४ -३०%२०२४-२५ - ५५%

 

टॅग्स :दिवाळी २०२५सोनंचांदीस्टॉक मार्केटशेअर बाजार