Home Buying Budget : स्वतःच्या हक्काचा फ्लॅट खरेदी करणे हे प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाचे स्वप्न असते. मात्र, घराची किंमत ठरवताना अनेकदा लोक स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन खर्च यांचा अंदाज घेत नाहीत. घराच्या किमतीव्यतिरिक्त हा खर्च मोठा असतो आणि तो बजेटमध्ये समाविष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे.
फ्लॅटच्या किमतीनुसार स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्चदिलेल्या माहितीनुसार, स्टॅम्प ड्युटीचा दर ७% आणि रजिस्ट्रेशन शुल्क जास्तीत जास्त ३०,००० रुपये निश्चित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, इतर शुल्क (वकील फी इत्यादी) म्हणून १५,००० जोडले आहेत.
| फ्लॅटची किंमत (रुपये) | स्टॅम्प ड्युटी (७%) (रुपये) | रजिस्ट्रेशन शुल्क (रुपये) | इतर शुल्क (रुपये) | एकूण अतिरिक्त खर्च (रुपये) || २५ लाख | १,७५,००० | ३०,००० | १५,००० | २,२०,००० || ३० लाख | २,१०,००० | ३०,००० | १५,००० | २,५५,००० || ३५ लाख | २,४५,००० | ३०,००० | १५,००० | २,९०,००० || ४० लाख | २,८०,००० | ३०,००० | १५,००० | ३,२५,००० || ५० लाख | ३,५०,००० | ३०,००० | १५,००० | ३,९५,००० || ६० लाख | ४,२०,००० | ३०,००० | १५,००० | ४,६५,००० |
| फ्लॅटची किंमत (रुपये) | स्टॅम्प ड्युटी (७%) (रुपये) | रजिस्ट्रेशन शुल्क (रुपये) | इतर शुल्क (रुपये) | एकूण अतिरिक्त खर्च (रुपये) | 
| २५ लाख | १,७५,००० | ३०,००० | १५,००० | २,२०,००० | 
| ३० लाख | २,१०,००० | ३०,००० | १५,००० | २,५५,००० | 
| ३५ लाख | २,४५,००० | ३०,००० | १५,००० | २,९०,००० | 
| ४० लाख | २,८०,००० | ३०,००० | १५,००० | ३,२५,००० | 
| ५० लाख | ३,५०,००० | ३०,००० | १५,००० | ३,९५,००० | 
| ६० लाख | ४,२०,००० | ३०,००० | १५,००० | ४,६५,००० | 
या खर्चाकडे दुर्लक्ष करू नकावर दिलेला तक्ता स्पष्ट करतो की, ५० लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी करताना तुम्हाला जवळपास ४ लाख रुपये केवळ स्टॅम्प ड्युटी आणि इतर शासकीय शुल्कापोटी भरावे लागतात.
- स्टॅम्प ड्युटीचे प्रमाण: फ्लॅटच्या एकूण किमतीच्या सुमारे ७% स्टॅम्प ड्युटी असल्याने, घराची किंमत जसजशी वाढते, तसतसे हे शुल्क लक्षणीयरीत्या वाढते. यात महाराष्ट्रात महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास १ टक्के सूट आहे.
- निश्चित शुल्क: रजिस्ट्रेशन फी आणि इतर चार्जेस (उदा. ३०,००० + १५,००० = ४५,००० रुपये) हे निश्चित स्वरूपाचे असतात.
वाचा - दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
तुमचे बजेट कसे ठरवावे?फ्लॅट खरेदी करताना जर तुम्ही होम लोन घेत असाल, तर बँक केवळ फ्लॅटच्या मूळ किमतीवरच कर्ज देते. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी आणि इतर खर्च तुम्हाला स्वतःच्या खिशातून भरावा लागतो. त्यामुळे, घर खरेदीचे बजेट ठरवताना, तुम्हाला लागणाऱ्या डाऊन पेमेंटसोबतच हा अतिरिक्त शासकीय खर्च देखील लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा ऐनवेळी आर्थिक अडचण येऊ शकते.
Web Summary : Buying a flat involves stamp duty and registration fees besides the cost. Stamp duty is 7%, with registration capped at ₹30,000. Budgeting for these extra costs is crucial, as banks only finance the flat's base price. Women get 1% discount in Maharashtra.
Web Summary : फ्लैट खरीदने में कीमत के अलावा स्टाम्प ड्यूटी और पंजीकरण शुल्क शामिल हैं। स्टाम्प ड्यूटी 7% है, पंजीकरण शुल्क अधिकतम ₹30,000 है। इन अतिरिक्त लागतों के लिए बजट बनाना महत्वपूर्ण है, क्योंकि बैंक केवल फ्लैट की मूल कीमत का वित्तपोषण करते हैं। महाराष्ट्र में महिलाओं को 1% छूट मिलती है।