Join us

ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:35 IST

Hema Malini Property: हेमा मालिनी यांनी मुंबईतील ओशिवरा परिसरातील त्यांचे दोन अपार्टमेंट विकले आहेत. हेमा मालिनी यांनी या अपार्टमेंटमधून बाजारभावापेक्षा दुप्पट नफा कमावला आहे.

Hema Malini Property : 'ड्रीम गर्ल' या नावाने प्रसिद्ध असलेल्या बॉलीवूड अभिनेत्री आणि मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी मुंबईतील ओशिवारा भागात १२.५० कोटी रुपयांना दोन अपार्टमेंट्स विकले आहेत. या दोन्ही मालमत्तांचे व्यवहार ऑगस्ट २०२५ मध्ये नोंदणीकृत करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हेमा मालिनी यांनी प्रत्येक फ्लॅटची विक्री बाजार मूल्याच्या (सरकारी मूल्यांकन) जवळपास दुप्पट किमतीत केली आहे. गेल्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने वाढत आहे.

उचभ्रू लोकवस्तीत अपार्टमेंटमिळालेल्या माहितीनुसार, विकलेले फ्लॅट्स अंधेरी वेस्टच्या प्रसिद्ध ओबेरॉय स्प्रिंग्स प्रोजेक्टमध्ये आहेत. हा परिसर मुंबईतील एक उच्च श्रेणीचा आणि महत्त्वाचा निवासी भाग म्हणून ओळखला जातो. येथील प्रीमियम गृहनिर्माण सोसायट्या, मनोरंजनाचे पर्याय आणि विकसित सामाजिक रचनेमुळे अंधेरी वेस्ट हा मुंबईतील सर्वात पसंतीचा आणि वेगाने वाढणारा परिसर बनला आहे. येथून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, एसव्ही रोड, सबअर्बन रेल्वे आणि वर्सोवा-घाटकोपर मेट्रो कॉरिडोरच्या माध्यमातून मुंबईतील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र सहज जोडलेले आहेत. ऑनलाइन प्रॉपर्टी पोर्टल 'स्क्वेअर यार्ड्स'ने महाराष्ट्राच्या महानिरीक्षक नोंदणी विभाग (IGR) च्या वेबसाइटवरील मालमत्ता नोंदणी संबंधित कागदपत्रांच्या आधारे ही माहिती दिली आहे. 

फ्लॅटचा आकार आणि किंमतनोंदणी कागदपत्रांनुसार, दोन्ही फ्लॅट्सचा कार्पेट एरिया सुमारे ८४७ चौरस फूट आहे, तर त्यांचे बिल्ट-अप क्षेत्रफळ सुमारे १,०१७ चौरस फूट आहे. प्रत्येक फ्लॅटची किंमत ६.२५ कोटी रुपये आहे, ज्यात एका कार पार्किंगच्या जागेचा समावेश आहे. या व्यवहारासाठी प्रत्येक फ्लॅटसाठी ३१.२५ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे.

वाचा - तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या

"ड्रीम गर्ल" हेमा मालिनीहेमा मालिनी या केवळ एक यशस्वी अभिनेत्रीच नाहीत, तर एक प्रतिभावान भरतनाट्यम नृत्यांगना, दिग्दर्शक आणि राजकारणी देखील आहेत. त्यांनी १९६३ मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आणि १९६८ च्या 'सपनों का सौदागर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली. 'ड्रीम गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हेमा मालिनी यांनी १९७० आणि १९८० च्या दशकात हिंदी सिनेमात आपले वेगळे स्थान निर्माण केले. याशिवाय, त्या मथुरा येथून खासदार म्हणून सक्रिय राजकारणात सहभागी आहेत. 

टॅग्स :हेमा मालिनीबांधकाम उद्योगगुंतवणूकपैसा