Join us

खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:36 IST

EPFO News: नोकरी करणाऱ्या लाखो लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आपल्या सदस्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

EPFO News: नोकरी करणाऱ्या लाखो लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) सदस्यांना पीएफ क्लेम सेटलमेंटवरील व्याज देण्यासंदर्भात काही प्रमाणात दिलासा देण्याची घोषणा केली आहे. ईपीएफओच्या नवीन नियमांमुळे ईपीएफ सदस्यांना ईपीएफ क्लेम सेटलमेंट आणि जलद क्लेम सेटलमेंटच्या वेळी अधिक व्याजासह रक्कम मिळण्यास मदत होईल. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) बैठकीत सीबीटीनं ईपीएफ योजना, १९५२ च्या परिच्छेद ६०(२) (बी) मध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्तीस मंजुरी दिली.

आता काय तरतूद आणि काय बदलणार?

सध्याच्या तरतुदींनुसार महिन्याच्या २४ तारखेपर्यंत निकाली काढलेल्या दाव्यावर मागील महिन्याच्या अखेरीपर्यंतच व्याज दिलं जातं. आता सेटलमेंटच्या तारखेपर्यंत सभासदाला व्याज दिलं जाणार आहे. यामुळे सभासदांना आर्थिक फायदा होईल आणि तक्रारी कमी होतील. आतापर्यंत महिन्याच्या २४ तारखेपर्यंत सेटलमेंट न केल्यास दाव्यांचा निपटारा होण्यास आणखी उशीर होत होता, असं अहवालात म्हटलं आहे. आता महिनाभर या दाव्यांवर प्रक्रिया केली जाणार आहे, ज्यामुळे प्रलंबित प्रकरणं कमी होतील, वेळेवर सेटलमेंट आणि संसाधनांचा अधिक वापर होईल. 

शेअर बाजारात पाचव्या दिवशी तेजी, सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला; 'या' स्टॉक्समध्ये तेजी

नवीन नियम काय?

बातमीनुसार, नवीन तरतुदीनंतर, ईपीएफ बॅलन्सवरील व्याज ईपीएफ क्लेम सेटलमेंटच्या तारखेपर्यंत उपलब्ध असेल. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, पूर्वीच्या नियमानुसार, जर महिन्याच्या २४ तारखेपर्यंत क्लेम सेटलमेंट केला गेला तर मागील महिन्याच्या अखेरीपर्यंतच व्याज दिलं जात होतं, ज्यामुळे सदस्यांना चालू महिन्याच्या सुरुवातीपासून ते सेटलमेंटच्या तारखेपर्यंतच्या दिवसांसाठी व्याज कमी झालं. आता नवीन दुरुस्तीनंतर, प्रत्यक्ष सेटलमेंट तारखेपर्यंत व्याज दिलं जाईल. दरम्यान, नवा नियम केव्हापासून लागू केला जाईल यासंदर्भात माहिती देण्यात आलेली नाही. परंतु सरकारद्वारे नोटिफिकेशन जारी केल्यानंतरच हा नियम लागू होईल.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीपैसागुंतवणूक