Gold Silver Price 24 Feb 2026: मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच एमसीएक्स (MCX) वर आज २४ फेब्रुवारी २०२६ रोजी बाजार उघडताच सोन्या आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केट 'कॉमेक्स'वर सुरुवातीच्या तेजीनंतर आता घसरण नोंदवली गेल. एमसीएक्सवर सोन्याचा भाव १,६०,४३३ रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा भाव २,६३,४३१ रुपये प्रति किलोग्राम झालाय. किमतींमध्ये आलेली ही घट पाहता, गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याचं दिसून येतंय.
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती
एमसीएक्सवर सोमवारी चांदीची किंमत २,६५,३५० रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाली होती, जी आज २,६३,४३१ रुपयांवर आली. तसंच, काल सोनं १,६१,६६८ रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झालं होतं, जे आज १,६०,४३३ रुपयांपर्यंत खाली आलं. कॉमेक्सवर सध्या सोन्याचा दर ५,१८९.१० डॉलर प्रति औंसवर आला आहे, जो आज सकाळी ५,२४० डॉलरवर होता. याशिवाय चांदीची किंमत ८६.७८५ डॉलर प्रति औंसवर आली असून सकाळी ती ८७.१५५ डॉलरवर होती.
शेअर बाजारात मोठी घसरण, निफ्टी १५२ अंकांनी घसरला; IT स्टॉक्स जोरदार आपटले
कमोडिटी मार्केटमधील चढ-उतार आणि जागतिक अनिश्चितता
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १५% टॅरिफची घोषणा केल्यानंतर कमोडिटी मार्केटमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा चढ-उताराची स्थिती निर्माण झाली आहे. बाजारपेठेत अजूनही अनिश्चितता कायम असून अमेरिका आणि इराण यांच्यातील परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे भविष्यात सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा तेजी येण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.
भारतातील प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे भाव
दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत १,६१,९३० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,४८,४५० रुपये आणि १८ कॅरेटचा दर १,२१,४९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
मुंबईत २४ कॅरेट सोनं १,६१,७८० रुपये, २२ कॅरेट १,४८,३०० रुपये आणि १८ कॅरेट १,२१,३४० रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उपलब्ध आहे.
- कोलकाता आणि बंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,६१,७८० रुपये तर २२ कॅरेटचा भाव १,४८,३०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तसंच दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू या चारही प्रमुख शहरांमध्ये चांदीची किंमत २,८५,००० रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचली आहे.
Web Summary : Gold and silver prices dipped on MCX. Gold is ₹1,60,433 per 10 grams, silver ₹2,63,431 per kg. International uncertainty impacts prices. City rates vary; Delhi gold (24K) is ₹1,61,930, silver ₹2,85,000 per kg.
Web Summary : एमसीएक्स पर सोना और चांदी के भाव गिरे। सोना ₹1,60,433 प्रति 10 ग्राम, चांदी ₹2,63,431 प्रति किलो। अंतर्राष्ट्रीय अनिश्चितता का असर। दिल्ली में 24 कैरेट सोना ₹1,61,930, चांदी ₹2,85,000 प्रति किलो।