Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीची किंमत धडाम! Silver मध्ये ४००० रुपयांची घसरण, सोनं झालं 'इतकं' स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 11:01 IST

Gold Silver Latest Rate Today: देशांर्गत आणि परदेशी बाजारातील संकेत, अमेरिकन डॉलरची मजबुती, व्याजदरातील बदलांची अपेक्षा आणि मागणी-पुरवठ्याचं गणित यांमुळे मौल्यवान धातूंच्या किमती प्रभावित होत आहेत.

Gold Silver Latest Rate Today: देशांर्गत आणि परदेशी बाजारातील संकेत, अमेरिकन डॉलरची मजबुती, व्याजदरातील बदलांची अपेक्षा आणि मागणी-पुरवठ्याचं गणित यांमुळे मौल्यवान धातूंच्या किमती प्रभावित होत आहेत. गेल्या काही दिवसांत मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्सवर (MCX) सोनं आणि चांदी या दोन्हीमध्ये मोठी अस्थिरता दिसून आली. कधी तीव्र घसरण तर कधी तेजी यामुळे बाजारात संभ्रमाचं वातावरण आहे. 

आज सोन्याच्या दरात १,००० रुपयांची घट झाली असून तो १५३,७५३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तसेच, १७ फेब्रुवारी रोजी चांदीच्या दरात ४,००० रुपयांची मोठी घसरण होऊन ती २,३५,७७३ रुपये प्रति किलो ग्रॅमवर आली. यापूर्वी मंगळवारी सोन्याच्या किमतीत सुमारे १ टक्क्यांची घसरण झाली होती, ज्याचं मुख्य कारण 'लूनर न्यू इयर'निमित्त चीनसारख्या आशियाई बाजारांमध्ये असलेल्या सुट्ट्या हे मानलं जात आहे.

मोठा खुलासा: अमेरिका म्हणाला, 'भारतानं रशियन कच्चं तेल न खरेदी करण्याचं दिलं आश्वासन;' काय म्हणाले जयशंकर?

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती आणि कॉमेक्सवरील दर

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचे दर ०.९ टक्क्यांनी घसरून ४,९४७.९८ डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. अमेरिकन गोल्ड फ्युचर्सच्या एप्रिल डिलिव्हरीच्या किमतीत १.६ टक्क्यांची घट होऊन त्या ४,९६६.८० डॉलर प्रति औंसवर आल्या आहेत. आज कॉमेक्सवर (Comex) सोन्याच्या दरात १.५१ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली असून किंमत ४,९७०.८० डॉलर प्रति औंसवर आली आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या भावातही ३.८० टक्क्यांची मोठी घसरण झाली असून ती ७५ डॉलर प्रति औंसवर व्यापार करत आहे. मजबूत अमेरिकन डॉलरमुळे सोन्यावर सातत्यानं दबाव निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

किमतीतील घसरण कायम राहणार का?

सध्या सोन्या-चांदीच्या किमतींवर नफा वसुलीचा दबाव दिसून येत आहे. बाजाराचं लक्ष आता अमेरिकेच्या पर्सनल कन्झम्पशन एक्स्पेंडिचर (PCE) आकडेवारीकडे आणि फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या (FOMC) बैठकीच्या इतिवृत्ताकडे लागलंय. जेएम फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष प्रणव मेर यांच्या मते, सोन्या-चांदीच्या किमती काही काळ मर्यादित कक्षेत राहतील. अमेरिकन जीडीपी आकडेवारी, पीसीई महागाई डेटा आणि फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांच्या टिप्पण्यांमुळे बाजारात अस्थिरता कायम राहू शकते. सध्या व्यापाऱ्यांमध्ये दिशा स्पष्ट नसल्यानं सराफा बाजार कन्सोलिडेशनच्या टप्प्यात असून गुंतवणूकदार नवीन मजबूत संकेतांची वाट पाहत आहेत.

गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय आणि तज्ज्ञांचे मत

सोनं हे नेहमीच गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय मानलं जातं, विशेषतः अनिश्चिततेच्या काळात लोक सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. दुसरीकडे, चांदीच्या किमती औद्योगिक मागणी आणि गुंतवणूक या दोन्हीवर अवलंबून असल्यानं त्यात जास्त वेगानं बदल होतात. जागतिक आर्थिक स्थितीतील अनिश्चितता, नफा वसुली, डॉलरचं मूल्य आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कल यांचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होत असतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold and Silver Prices Plunge: Sharp Decline in Rates

Web Summary : Gold prices fell by ₹1,000 to ₹153,753 per 10 grams. Silver crashed by ₹4,000 to ₹2,35,773 per kg. International market trends, a strong dollar, and upcoming US economic data are influencing the volatility. Experts advise watching for further market signals.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक